कामगार नेते व समाजसेवक
अनिल गणाचार्य यांचा सन्मान
कामगार नेते, इंटक व मुंबई काँग्रेसचे सचिव तसेच सामाजिक कार्यकर्ते अनिल गणाचार्य यांना त्यांच्या सार्वजनिक क्षेत्रातील कार्याबद्दल गोरेगाव
येथील केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या सभागृहात आयोजित सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी दीर्घ व विशेष योगदानाबद्दल बॉलिवूडमधील कलाकार तसेच प्रसारमाध्यमांतील प्रतिनिधींचा सन्मान सोहळादेखील बॉलिवूड बिग स्क्रीनच्या किशोर राजपूत आणि लेखक-दिग्दर्क शरदराज गायकवाड यांच्यावतीने आयोजित करण्यात आला.
यावळी सन्मानित करण्यात आलेल्या मान्यवरांची नावे अशी – कै. रामकृष्ण लोंढे (निर्माता व दिग्दर्शक), विकास पांचाळ (उत्तम छायाचित्रकार),
एस. कुमार (दिग्दर्शक), सी. के. थापा (फिटनेस गुरु), केतन कारंडे (अभिनेता), भारती देवरुखकर (लावणी नर्तिका), माधवी राणे,
सूर्यकांत मिश्रा व बाळा काणेकर (सामाजिका कार्य), शर्मिला डे (अभिनय), राजेश मित्तल (दिग्दर्शक-वितरक), नसीर तगाले (सिने पत्रकार), तेजस ठाकूर (बाल कलाकार), अरविंद मिश्रा (पत्रकारिता),
ओमप्रकाश प्रजापती (संपादक), केतन खेडेकर (पत्रकारिता), अशोक शिंदे (संपादक), सुरेश गुप्ता (अखिल भारतीय सिने वर्कर्स असोसिएशन). परवीन शर्मा पत्रकार
या कार्यक्रमास बॉलिवूड तसेच छोट्या पडद्यावरील अनेक कलाकार उपस्थित होते.
अंजन गोस्वामी, भोजपूरी सिनेमाचे निर्माता-दिग्दर्शक पी. अभय कुमार,
कामगार नेते, इंटक व मुंबई काँग्रेसचे सचिव अनिल गणाचार्य यांच्या हस्ते मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात श्रीगणेश वंदनाने करण्यात आली.
याप्रसंगी विविध कलाकारांनी लावणी, नृत्य, गाणी, गिटार वादन पेश केले
.