Ticker

6/recent/ticker-posts

पर्यावरण संवर्धनासाठी किनवट येथे भव्य मॅरेथॉन


किनवट नगर  परिषद तर्फे माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत प्लास्टीक मुक्त किनवट शहर  व वृक्ष पर्यावरण  सर्वंधन राखण्यासाठी किनवट शहरात आमदार भिमराव केराम यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथुन भव्य मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते .

यावेळी सहायक जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी हिरवी झेंडी दाखवली या प्रसंगी कॉस्मापाॅलिटन विद्यालयाचे  बाळकृष्ण कदम यांनी पर्यावरण सुंदर व स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांना शपथ दिली 
यावेळी तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी डॉ.मृणाल जाधव, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, उपाध्यक्ष अजय चाडावार, दिनकर चाडावार, 

माजी नप उपाध्यक्ष नगर सेवक श्रीनिवास नेम्मानिवार, माजी नप अध्यक्ष साजिद खान, अभय महाजन, विजय जोशी, 

राजु पिलेवार ,स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत दुधारे,गणराज गायकवाड, राहुल सोमवार, काकडे सर सोनटक्के सर ,

देशमुख मॅडम ,पोले सर संदीप येशिमोड , सर्व नगर परिषद कर्मचारी स्टाफ राठोड सर व शालेय विद्यार्थी , शोटोकॉन डो अकॅडमीचे विद्यार्थी , 

सौ. लक्ष्मीबाई यशीमोड संस्थेचे विद्यार्थी आदी विद्यार्थ्यानीं मॅरेथॉन मध्ये उत्सफुर्तपणे सहभागी झाले होते.