Ticker

6/recent/ticker-posts

अर्धापुरात १२ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार विरोधी उमेदवार पुरावे गोळा करण्यासाठी लागले कामाला


अर्धापुरात १२ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार 
        विरोधी उमेदवार पुरावे गोळा करण्यासाठी लागले कामाला

अर्धापूर/खतीब अब्दुल सोहेल

अर्धापूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडून आलेल्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार असून तीन अपत्ये आसने, शासकीय भूखंडावरील अतिक्रमणे, 

अनाधिकृत बांधकामे, अतिक्रमणाला प्रोत्साहन देणे या प्रमुख मुद्द्यांवर दहा ते बारा नगरसेवकांचे पद जाऊ शकते.

 निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार विजयी उमेदवारांचे अपत्य, भुखंडावरील अतिक्रमणे या बाबतचे पुरावे जमा करण्याचे

काम युध्दपातळीवर करित आहेत. 
अपात्रतेची टांगती तलवार असलेल्या नगरसेवकात काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या जास्त आहे.

 काही नगरसेवक न्यायालयात जगण्याच्या तयारित आहेत.

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या विधानसभा मतदारसंघातील अर्धापूर नगरपंचायतीच्या तिसरी निवडणूक नुकतीच पार पडली आहे.

 या निवडणुकीत काँग्रेसला दहा, एमआयएमचे तीन, भाजप दोन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक, अपक्ष एक असे उमेदवार निवडून आले

आहेत. काँग्रेसला तिसऱ्यांदा बहूमत मिळाले आहे.
 ही तिसरी निवडणूक अटीतटीची व प्रतिष्ठेची झाली. विजयी व पराभूत उमेदवारांनी लाखोचा खर्च केला आहे. 

या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना पराभव चांगलाच जिव्हारी लागल्यामुळे विजय उमेदवारांना अडचणीत आणण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू करित आहेत.

जास्त असलेल्या निवडणूक लढविता येत नाही. तसेच या बाबतचे शपथपत्र द्यावे लागते. 

जर या कायद्याप्रमाणे दोन पेक्षा जास्त अपत्य आहेत हे सिद्ध झाले तर निवडून आलेल्या उमेदवारांचे सदस्यत्व रद्द करण्यात येते. 

तसेच कुटुंबातील सदस्याने शासकीय भूखंडावर अतिक्रमण केले असल्याचे सबळ पुरावे सादर केल्यास नगरसेवकपद जावूशकते. 

अशा अनेक प्रकरणात सदस्यत्व रद्द झाल्याची प्रकरणे आहेत.

 अनाधिकृत बांधकाम, अतिक्रमणाला प्रोत्साहन देणे, पदाचा दुरूपयोग करून शासकीय योजनांचा

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना सप्टेंबर २००१ मध्ये करण्यात आलेल्या कायद्याप्रमाणे दोन पेक्षा

लाभ घेणे आदी कारणांमुळे नगरसेवक पद रद्द होते.
अर्धापूर शहरात शासकीय गायरान जास्त असल्यामुळे शहरातील मातब्बरांनी अतिक्रमण केले

 असल्याचे शासकीय अभिलेखात नोंदी पाहण्यास मिळतात.
 तसेच शहरातील चहू बाजुंनी शासकीय गायरान आहे. 

या शासकीय भुखंडावरील अतिक्रमणे कोण कोणत्या नगरसेवकांना डोकेदुखी ठरणार या बाबत जोरदार राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.