कांग्रेसचे जेष्ठ नेते नामदेवराव केशवे काका यांची प्रमिल नाईक यांनी घेतली सदिच्छा भेट.
माहुर/ किनवट भागातील कांग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते युवकाचे आधारस्तंभ आदरणीय नामदेवराव केशवे काका यांचा वाढदिवस त्यांच्या राहत्या घरी अत्यंत थाठात सम्पन्न झाला होता .
त्यावेळी केशवे साहेबाच्या मुळगांवी म्हणजे माहुर तालुक्यातील आष्टा येथे शुभेच्छा देण्यासाठी सर्वपक्षीय नेत्याची मांदियाळी जमली होती.
पण नेमके त्याच दिवशी दिल्लीमध्ये कांग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलच्या राष्ट्रीय अध्यक्षाचा पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला होता .
प्रमिल नाईक हे अखिल भारतीय कांग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलचे राष्ट्रीय समन्वयक आहेत .त्यामुळे ते स्वताहा केशवे साहेबाना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देऊ शकले नव्हते .
त्यांमुळे आज प्रमिल नाईक यांनी नामदेवराव केशवे काकाना प्रत्येक्ष भेटून शुभेच्छा दिल्या व आगामी जिल्ह्य परिषद निवडणूक व विधानसभा क्षेत्रातील अनेक मुद्यावर दीर्घ चर्चा केली.
The titvi news network (p)limited