Ticker

6/recent/ticker-posts

नांदेड| शहरातील हुजूर साहिब नांदेड येथील रेल्वेस्थानक परिसरातील प्लॅटफॉर्मवर आज सकाळी १० वाजेच्या सुमारास एका अज्ञात युवकाने मुंबईकडे जाणाऱ्या तपोवन एक्सप्रेसच्या खिडकीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे

नांदेडमध्ये तपोवन एक्सप्रेसच्या खिडकीला गळफास घेवून युवकाची आत्महत्या 




नांदेड| शहरातील हुजूर साहिब नांदेड येथील रेल्वेस्थानक परिसरातील प्लॅटफॉर्मवर आज सकाळी १० वाजेच्या सुमारास एका अज्ञात युवकाने मुंबईकडे जाणाऱ्या तपोवन एक्सप्रेसच्या खिडकीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 

युवकाचा मृतदेह रेल्वेच्या खिडकीला लटकून असलेल्या अवस्थेत निदर्शनास आला आहे. 


नांदेड येथून दररोज सकाळी १० वाजता तपोवन एक्सप्रेस ही गाडी मुंबईकडे रवाना होते. 

आज दि.३०  मार्चच्या सकाळी प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर तपोवन एक्सप्रेस हि गाडी उभी होती.

 त्यापैकी एका बाहेर बोगीच्या शौचालय खिडकीला अंदाजे २५ वर्षीय अनोळखी युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

गळफास घेतलेल्या मयत युवकाच्या अंगात पिवळ्या रंगाचा शर्ट आणि निळी पॅन्ट घातलेला आहे. 

रेल्वेच्या डब्याला गळफास घेऊन आत्महत्या करण्याची हि नांदेडमधील पहिलीच आहे.

 रेल्वे पोलीसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

मयत युवक कोणाच्या ओळखीचा असल्यास नागरिकांनी लोहामार्ग विभागाचे पोलीस निरिक्षक सुरेश उनवणे, 

सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक विजया मेलफेदेवार यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.