Ticker

6/recent/ticker-posts

अंधाऱ्या काळोखाला छेद देणारा प्रकाशमय -नारायणराव सिडाम डोंगराळ जंगलव्याप्त परिसरातील मौजे चिखली (बु ) ता. किनवट जि. नांदेड या खेडे गावात वडील राजाराम व आई लक्ष्मी सिडाम यांच्या पोटी दि. 12 एप्रिल 1951 ला नारायणराव सिडाम यांचा जन्म झाला.पुढे पुत्र नारायण आठ महिन्याचे असतांना आई लक्ष्मीचे निधन झाले.


अंधाऱ्या काळोखाला छेद देणारा प्रकाशमय  -नारायणराव सिडाम 

🖊गोपाल कन्नाके , किनवट 
  (डी. एड.एम.ए.बी. एड. एम.एड)

            डोंगराळ जंगलव्याप्त परिसरातील मौजे चिखली (बु ) ता. किनवट जि. नांदेड या खेडे गावात वडील राजाराम व आई लक्ष्मी सिडाम यांच्या पोटी दि. 12 एप्रिल 1951 ला नारायणराव सिडाम यांचा जन्म झाला.पुढे पुत्र नारायण आठ महिन्याचे असतांना आई लक्ष्मीचे निधन झाले.

लेकराचे पालन पोषण करण्यासाठी लक्ष्मीबाईची लहान बहीण सीताबाई यांच्याशी वडील राजारामबापु विवाह केले.हिच लक्ष्मीबाई पुत्र नारायण यांना लहानाचे मोठे करत त्यांना सुसंस्कार दिलेत.

वडील राजाराम सिडाम हे सदन शेतकरी असल्याने घरची परिस्थिती बरी होती.त्याकाळात अनेकदा दुष्काळ यायचा. अशा वेळी राजाराम 

यांनी परिसरात गोरगरिबांना घरांतील धान्य देऊन लोकांना जगवत होते.दानशूर म्हणुन पंचक्रोशीत त्यांची ख्याती  होती.

राजाराम बापु स्वतः अडाणी होते.त्यांना लिहता वाचता येतं नव्हते.त्याकाळी शिक्षणाचे विकेंद्रीकरण ही फारसे झाले नव्हते.किनवट सारख्या दुर्गम आदिवासी तालुक्यात तर शिक्षण म्हणजे दुर्मिळ असेच होते.मात्र वडील राजाराम बापु

 यांना भजन कीर्तनाचा छंद होता.तुकडोजी महाराज या सारख्या संतांच्या विचाराचा पगडा असल्याने अन शिक्षणं हे वाघीनीचे दुध आहे. या अशा विचारातून राजारामबापूने मुलगा नारायणराव यांना गावालगतच्या बुधवार पेठ या गावांतील जि. प. च्या शाळेत दाखल केलेत.येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर 

किनवट येथील जि.प. हायस्कूल मध्ये 10 पर्यंतचे शिक्षण दिले. मुलगा नारायणराव यांची शिक्षणातील धडपड  पाहून पुढे त्यांना नांदेड येथील पीपल्स महाविद्यालयात दाखल केले असता.कला शाखेत उत्तीर्ण होत पदवीधर झालेत.याच महाविदयालयात इंग्रजी सारख्या कठीण विषयात त्यांनी एम. ए. पास झाले. 

एकीकडे उच्च शिक्षित म्हणुन नारायणराव सिडाम  यांना सब जेलर , उपविभागीय पोलिस अधिकारी अशा उच्च हुद्द्यावर  सेवा करण्याची नामी संधी चालून आली होती.तर दुसरीकडे समाज सेवेत मन गुंतले होते

.त्याकाळी गोर गरिबांच्या वाट्याला अनेक भयाण यातना यायच्या.त्यामुळं त्यांनी नौकरीच्या अनेक संधी दुर्लक्ष करून समाज सेवेत जनतेच्या कल्याणासाठी मानवतावादी सेवेत स्वतः ला समर्पित केले होते. अशाच परिस्थिती मध्ये

 त्यांच्या कुटुंबीयांनी नारायणराव यांचे लग्न करण्याचे ठरवले असता.माजी मंत्री बाबुराव मडावी यांची जबलपुर (म. प्र.) येथील बी. एससी बी. एड उच्च शिक्षित भाची रत्नाबाई यांच्याशी 1979 साली विवाह जुळून आले.
लग्नानंतर त्यांनी पुन्हा समाज सेवेत मग्न होऊन शिक्षणाचे महत्व ओळखून गोर गरिबांना शिक्षण मिळावे.शिक्षणातूनच खरा विकास होतो. हा उदांत  हेतू मनात बाळगून किनवट सारख्या अती दुर्गम आदिवासी भागात इंग्रजी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवत इंग्रजी माध्यमाची पहिली शाळा 1973 ला काढली. 

पुढे विस्तार करत हिमायतनगर भोकर नांदेड येथे ही इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढून गोरगरिबांना शिक्षणाची दारे खुली केले होते.येथे त्यांची  दूरदृष्टी प्रखरतेने दिसून येते.

जंगल डोंगर कपारीत राहणारा माझा आदिवासी समाज ही शिकला पाहिजे.शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे.या विचारातून खेडोपाडी जाऊन शिक्षणाचे महत्व पटवून देत होते.मात्र त्याकाळी जंगलात राहणाऱ्या आदिवासी गांव पाडयात जि. प च्या शाळा फार कमी होत्या.

 घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने शेतात माय बापाला मदत करणारे  आदिवासी विद्यार्थी शिक्षणा पासुन कोसोदूर होते.सर्व परिसर पिंजून काढल्यावर लोकांशी हितगुज केले असता.

आदिवासी विद्यार्थ्याना बोर्डिंग सारख्या ठिकाणी शिक्षणासाठी दाखल केल्यास त्यांचा राहणे खाणे कपडे आदी बाबी सुटल्यास शिक्षण घेऊ शकेल.असा पुढचा विचार करून राज्यमंत्री बाबुराव मडावी यांना सोबत घेऊन पहिले आदिवासी मंत्री सूरूपसिंग नाईक

 यांना निवासी आश्रम शाळेची संकल्पना पटवून दिले.त्यामुळं किनवट तालुक्यात पहिली आश्रम शाळा1975 साली  निर्माण झाली.

युवा संघर्ष नावाचे साप्ताहिक सुरु करून आदिवासी समाजात जनजागृती व प्रबोधन घडवून आणले असून जंगल कामगार सेवा सहकारी सोसायटीमध्ये गैर आदिवासीची निवड होऊन जंगल नेस्तनाबूत होत असायचे.त्यावेळी सहकार मंत्र्यांना भेटून अशा सोसायटीवर फक्त मुळ आदिवासीची नेमणुक व्हावी.

यांसाठी  कायदा करून घेत आदिवासीच्या जंगलाचे संवर्धन करण्यास चोख भुमिका ही त्यांनी पार पाडली आहे.शिवाय आदिवासी सेवा सोसायटय़ा त्यांनी स्वतः रजिस्टर करून लोकांना काम करण्याची मुभा दिली आहे.आदिवासी विकास प्रकल्प किनवट आढावा समिती अध्यक्ष 

या नात्याने त्यांनी गोरगरीब आदिवासी , आदिम जमात कोलाम समाज बांधव यांना घर , विहीर मंजूर केले असून आदिवासी विद्यार्थ्याना शिक्षणासाठी अनेकदा योजना मिळवून दिले. 

समाजाचा गाडा हाकत असतांना दुसरीकडे नारायणराव यांची  पत्नी रत्नाबाई यांचे विवाहाच्या सात वर्षानंतर निधन झाले होते. त्यांच्या उमदीच्या काळात दुसरे विवाह न करता नारायणराव 

यांच्यावर संजय , विजय , राजीव अशा तीन चिमुकल्या लेकराचा सांभाळ करण्याची मोठी जबाबदारी येऊन पडली होती.

अशा ही परिस्थिती मध्ये वडील म्हणुन या लेकराना स्वतः च मायेचे प्रेम देऊन लहाणाचे मोठे केलेत.या काळात त्यांची तारेवरची  कसरत चालु होती.

अशा भीषण संकटातून त्यांनी तग धरून समाज व कुटुंब या दोन्ही घटकाला न्याय देण्यास क्षणभर ही मागे हाटले नाहीत.

गोरगरीब आदिवासी समाज हा अत्यंत भयाण समस्या  घेऊन जगायचा. त्यांच्या वाट्याला दुःख दारिद्र्य येऊन जगण्याचा प्रश्ण आ वासून उभे  राहायचे.

जंगलव्याप्त डोंगराळ भागात वास्तव करणारा आदिवासी माणुस स्वभावाने लाजरा  बूजरा असल्यानं त्यांच्यात शिक्षणाची कमालीची अनास्था होती.

त्यातच त्यांच्याकडे कोणत्याही भौतिक सुविधा नसायच्या अशा कठीण काळात आदिवासी उपाययोजना मधुन आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रस्ते , 

घर , पाणी , शिक्षण , आरोग्य आदी सुविधा मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रशासन व सरकार दरबारी नारायणराव यांनी पाठपुरावा करत होते. 

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद मराठवाडा विभागीय अध्यक्ष म्हणुन नारायणराव सिडाम यांनी विविध मोर्चे आंदोलने रास्ता रोखो आदी लोकशाही मार्गाने आदिवासीच्या समस्यावर सरकार दरबारी उठाव करत होते.

त्यांच्या या अतुलनीय कामगिरीला लक्षात घेऊन 1995 साली महाराष्ट्र सरकारने त्यांना आदिवासी सेवक पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे , माजी मंत्री बाबुराव मडावी आदी पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

1971 पासुन राजकारणात सहभागी झाल्याने गोकुंदा शहाराच्या  ग्रामपंचायतीचे ते अनेक काळ सरपंच म्हणुन विकासप्रिय कामे केलेत.कृषीउत्तन्न बाजार समितीचे सभापती या नात्याने  त्यांनी शेतकऱ्यासाठी विधायक कामे केलेत.स्थानिक स्वराज्य ते आमदारकीच्या निवडणूका ही त्यांनी लढले आहेत. 

प्रसिध्द नागढव मंदिराचे ते अध्यक्ष म्हणुन कामकाज पहिले असून काँग्रेस पक्षाचे  तालुका अध्यक्ष ते आदिवासी आघाडी  काँग्रेस कमिटीचे राज्य उपाध्यक्ष पदावर राहून माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण , मा. खासदार उत्तमराव राठोड , 

माजी आमदार किसनराव  पाचपोते , विद्यमान मंत्री अशोकराव चव्हाण , माजी मंत्री बाबुराव मडावी , माजी मंत्री शिवाजीराव मोघे , माजी मंत्री वसंत पुरके , जेष्ठ नेते नामदेवराव केशवे 

यांच्या खांद्याला खांदा लावून पक्ष वाढीसाठी अन जनतेच्या कल्याणासाठी अहोरात्र अथांग कष्ट घेत संपुर्ण राज्यांत व किनवट सारख्या मागास तालुक्यात विकासप्रिय काम करत होते.

उत्तमराव राठोड आदर्श विद्यालय किनवट ही विनाअनुदानीत शाळा उभी करून  तब्बल 12 वर्षे स्व खर्चातुन चालवत अल्पावधीत  शाळेला नावलौकिक मिळाले असून आता ही शाळा 20 % अनुदान प्राप्त करून पुन्हा जोमाने शिक्षणाची गंगा गरिबांच्या झोपडी पर्यंत पोहच करण्याचे काम हाती घेतले आहेत.

असा हा जिद्दी शिस्तप्रिय चारित्र्यवान नारायणराव अंधाऱ्या काळोखाला छेद देत प्रकाश देणारा हिरा अन त्यांचे अभूतपूर्व कार्य विधायक अविस्मरणीय असेच आहेत. त्यांच्या विधायक कामाला मानाचा सलाम करत त्यांना या 71 व्या जन्म दिनी दीर्घायुष्य , सुख समृद्धी निरोगीमय जीवन लाभो.हिच मनोकामना.

🖊गोपाल कन्नाके , ( शिक्षक ) किनवट 
जिल्हा उपाध्यक्ष - ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ट्रायबल नांदेड