Ticker

6/recent/ticker-posts

#सत्तेच्या_नशेत_बेभान_वादग्रस्त_निर्णय_घेऊन#धार्मिक_भावना_दुखावणारी_किनवट_नगर_परिषद_बर्ख़ास्त_कराकाल दिनांक 28 एप्रिल 5 वाजता किनवट शिवाजीनगर रेलवे गेट जवळील किनवट शहरातील अल्पसंख्यांक समाज असलेल्या "शिया इमामी ईस्माइली मुस्लिम(खोजा) बांधवांच्या" सन.1960 पूर्वी पासून अस्तित्वात असलेल्या कब्रस्तानचे वॉल कंपाउंड बोल्डोजरच्या सहाय्याने तोडण्यात आले आहे


#सत्तेच्या_नशेत_बेभान_वादग्रस्त_निर्णय_घेऊन
#धार्मिक_भावना_दुखावणारी_किनवट_नगर_परिषद_बर्ख़ास्त_करा
काल दिनांक 28 एप्रिल 5 वाजता किनवट शिवाजीनगर रेलवे गेट जवळील किनवट शहरातील अल्पसंख्यांक समाज असलेल्या

 "शिया इमामी ईस्माइली मुस्लिम(खोजा) बांधवांच्या" सन.1960 पूर्वी पासून अस्तित्वात असलेल्या कब्रस्तानचे वॉल कंपाउंड बोल्डोजरच्या सहाय्याने तोडण्यात आले आहे,

 ही कार्यवाही किनवट नगर परिषदे मार्फ़त करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे, या करिता कोणतीही नोटिस किंवा पूर्व सूचना देण्यात आली नाही.


खरंच किनवट नगर परिषदेने अश्या पवित्र रमजान महिन्यात 

शिवाजी नगर रेलवे गेट जवळ असलेल्या शिया मुस्लिम खोजा बांधवांच्या कब्रस्तानच्या वॉल कंपाउंडवर बुलडोजर फिरविले असेल तर नगर परिषदेचे हे धार्मिक भावना दुखावणारे कृत्य निंदनीय आहे.

किनवट-बल्लोरी डीपी रसत्याच्या नावाने या रेलवे गेट जवळील 

गाँधीनगर नामक गरीब वस्ती उद्धवस्त केल्यानंतर आता ह्या 18 मीटर रुंदीचा वादग्रस्त प्रस्तावित डीपी रस्त्यासाठी अडथळा ठरत असलेल्या खोजा बाँधवांचा कब्रस्तान किनवट नगर परिषदेच्या रडारावर आहे.

 हा 18 मीटर रुंदीचा रस्ता पूर्ण करायचा असेल तर या कब्रस्तानतुन कमित कमी 15 मीटर रुंद जागा घ्यावी लागेल. कारण रेलवे पटरीच्या संरक्षण भींत नंतर फक्त 3 मीटर रुंद जागा 

या रसत्यासाठी शिल्लक राहत असल्याने 18 मीटर रस्ता करण्यासाठी 15 मीटर रुंद जागा कब्रस्तानतुनच घ्यावी लागेल म्हणुन नगर परिषद

 किनवट आणी या रसत्यासाठी उताविळ असलेले शेतकरी (भविषयातिल प्लॉटिंगचे मालक) किनवट शहरात अल्पसंख्यांक असलेल्या खोजा मुस्लिम बंधवावर दबाव आणत आहे.

@विशेष म्हणजे या डीपी रसत्यासाठी गांधीनगर नामक गरीब वस्ती वद्धवस्त करण्यायापासुन ते आज पर्यंत किनवट नगर परिषद या जागेवर आपली मालकी सिद्ध करू शकली नाही.


@या रसत्यासाठी किनवट-बल्लोरी पर्यंत हा रस्ता ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून जाणार आहे अश्या कोणत्याही शेतकऱ्यांची जमीन नगर परिषदेने भू-संपादन केले नाही.


@रसत्यासाठी बल्लोरी पर्यंत येणारी कोणतिही जमीन भू-संपादन न करता आदिग्रहण न करता या खोजा मुस्लिम बाँधवांच्या 1960 पूर्वी पासून अस्तित्वात असलेल्या स्वताच्या मालकी 

सर्वे नम्बरच्या कब्रस्तानातील कबरी उखाडण्यासाठी नगर परिषदेने जो तय्यारी चालविली आहे ती अयोग्य आहे.


किनवट नगर परिषदेने त्या कब्रस्तानात दफन असलेल्या कबरी उखाडून त्या कबरिवरुन रस्ता निर्माण केल्यास हे नगर परिषदेचे कृत्य धार्मिक भावना दुखवणारे कृत्य असल्याने कृप्या 

किनवट नगर परिषदेने असे कोणतेही कृत्य करण्या अगोदर 10 वेळा पुनर विचार केला पाहिजे आणी आपली जागा नसतांना केवळ डीपी रस्त्यावर येत असल्याने खोजा बंधवांच्या स्वताच्या मालकीच्या कब्रस्तानमधील कबरी उखाड़नया पर्यंतचे टोकाचे वादग्रस्त निर्णय घेऊ नये.


सत्तेच्या नादात अश्या बेभान वादग्रस्त निर्णय घेणाऱ्या किनवट नगर परिषदेला कुठे तरी आळा घातला पाहिजे, 

या करीता नांदेड़ जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणी नगर परिषदेत सत्तेत असलेल्या पक्षाच्या वरिष्ठ पदधिकाऱ्यांनी या गंभीर बाबी कळे जातिने लक्ष देवून 

या प्रकरणात योग्य निर्णय घ्यावा.
आणी हे कब्रस्तानचे प्रकरण खोजा बांधवांच्या कब्रस्तानात दफन असलेल्या पवित्र अश्या कबरीच्या आस्थेचे प्रश्न असल्याने कृप्या अश्या प्रकरणी वरिष्ठ व उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शन

 व निर्णयाशिवाय याच्यावर कोणतीही पुढील कार्यवाही करण्यात येऊ नये. ही विनंती.. ! जय हिंद
#जिंदो_को_उजाड़_दिया_अब_क्या_मुर्दे_भी_उखाड़ेंगे