Ticker

6/recent/ticker-posts

किनवट प्रतिनिधी सार्वजनिक भीम जयंती उत्सव समिती घोटीच्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सोहळा 28 एप्रिल रोजी आयोजित केला असून यानिमित्त महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक झी युवा संगीत सम्राट अजय देहाडे व इंडियन आयडल गोल्डन युवा रॉकस्टार संतोष जोंधळे


किनवट प्रतिनिधी
 सार्वजनिक भीम जयंती उत्सव समिती घोटीच्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सोहळा 28 एप्रिल रोजी आयोजित केला असून यानिमित्त  महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक झी युवा संगीत सम्राट अजय देहाडे व इंडियन आयडल गोल्डन युवा रॉकस्टार संतोष जोंधळे 

यांचा बुद्ध भीम गीतांचा बहारदार सामना होणार आहे या कार्यक्रमाचा किनवट तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा 

असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी  घोटी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार असून या निमित्त भा बौ महासभा  

शाखा घोटी व रमामाता महिलां मंडळाच्यावतीने बौद्ध श्रामनेर शिबिर घेण्यात येत आहे 26 एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची गावातील मुख्य मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे

 तर 28 एप्रिलला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक झी युवा संगीत सम्राट फेम अजय देहाडे तसेच इंडियन आयडल गोल्डन तिकीट युवा रॉकस्टार संतोष जोंधळे 

यांचा बुद्ध भीमगीतांचा जंगी सामना आयोजित केला आहे 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा नगराध्यक्ष अरुण आळणे हे राहणार आहेत तर पूर्णा येथील मा नगराध्यक्ष मोहन मोरे 

यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे  कार्यक्रमास आ भीमराव केराम, माजी आमदार प्रदीप नाईक, 

सहायक पोलिस अधीक्षक अरुण डोंगरे, अभि प्रशांत ठमके, प्रकाश गायकवाड, पोलीस निरीक्षक अभिमन्यू साळुंके, युवा नेते विकास कुडमेते,परविन म्याकलवार, 

अनिल कराळे पाटील, हिराबाई  आडे, प्रकाश  राठोड यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे

 या निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त यादवराव तामगाडगे गुरुजी, 

वैद्यकीय अधिकारी डॉ सुनील भवरे, पोलीस निरीक्षक यशोधरा मुनेश्वर, वैद्यकीय अधिकारी डॉ जयपाल पाटील, वैद्यकीय अधिकारी निवेदिता गणेश पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे 

या कार्यक्रमास किनवट माहूर तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे 

असे आवाहन सार्वजनिक भीम जयंती उत्सव समिती घोटीच्या वतीने अध्यक्ष दत्ता कसबे, लक्ष्मण भवरे,संयोजक सतीश भवरे, राम शंक धरे,  

गणेश पाटील, साहेबराव भवरे, आकाश भवरे, धम्मदीप पाटील, राहुल पाटील, ऋषिकेश लढे, धम्मपाल पाटील, राहुल पाटील, तेजस पाटील आदिनी केले आहे .इस