पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ च्या कार्याध्यक्ष पदी नियुक्ती.
पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आंबेगावे यांनी दिल्या शुभेच्छा.
किनवट : माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ या आरटीआय कार्यकर्त्यांच्या राज्यव्यापी संघटनेच्या कार्याध्यक्ष पदी पत्रकार आशिष शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्ती बद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांनी शेळके यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ चे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या नेतृत्वाखाली, दिनांक १७ मार्च रोजी मुंबई येथील कार्यालयात,
कार्यकर्ता महासंघाच्या राज्यस्तरीय पदाधिकारी निवड समितीच्या शिफारशी नुसार व सर्वानुमते आशिष शेळके यांची कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली होती.
पण दिनांक २९ मार्च रोजी नियुक्तीपत्र व ओळखपत्र देऊन ही बातमी प्रसार माध्यमांना देण्यात आली आहे.
पत्रकार बांधवांना बोलताना आशिष शेळके म्हणाले की, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ या संघटनेचा एकमेव उद्देश म्हणजे, केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम २००५
या कायद्याचा वापर योग्य ठीकाणी व योग्य पद्धतीने करुन, भ्रष्ट शासकीय कार्यालय व अधिकारी यांना धडा शिकवुन सामान्य नागरीकांना मदत करणे हा आहे.
मी नक्कीच या पदाचा उपयोग करून आणि सुभाष बसवेकर यांच्या नेतृत्वाखाली व राज्यातील संघटनेतील सर्व आरटीआय कार्यकर्त्यांच्या सहकार्याने प्रशासन पारदर्शी,
लोकाभिमुख व भ्रष्टाचार मुक्त ठेवण्याचा प्रयत्न करीन. ज्या शासकिय कार्यालयात सामान्य नागरीकांना त्रास होत असेल तिथे नागरीकांना न्याय मिळवून देईल.
जेथे भ्रष्टाचार होत असेल तेथील भ्रष्टाचार उघड करेल आणि माहिती अधिकार कायद्याचा सर्व शासकीय कार्यालयात योग्य पद्धतीने व योग्य ठिकाणी वापर करेल, असे सांगितले.
आशिष शेळके यांच्या नियुक्ती चे सर्वच स्तरातुन स्वागत होत आहे, तसेच या नियुक्तीने आता भ्रष्ट कार्यालय व भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.