किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट ते मेंडकी रोडवरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे तसेच कंत्राटदाराने दिशादर्शक फलक न लावल्यामुळे अपघात होऊन पूतना गंभीर जखमी झाला आहे
या अपघातास कंत्राटदाराचा निष्काळजीपणा जबाबदार असल्यामुळे कंत्राटदारासह संबंधित अधिकाऱ्यावर दखलपात्र गुन्हे दाखल करून नुकसानभरपाई द्यावी
अशी मागणी प्रल्हाद सवाई राम राठोड यांनी नांदेडच्या जिल्हाधिकार्यांकडे लेखी निवेदन देऊन केली आहे
निवेदनात नमूद केले आहे की किनवट ते मेंडकी रोडवरील मोठमोठ्या खड्ड्यामुळे व कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे मेंडकी गावाजवळील पुलावर भीषण अपघात झाला
या अपघातात पुतण्या गंभीर जखमी झाल्यामुळे सध्या तो दवाखान्यात उपचार घेत आहे
मेंडकी पुलाजवळ मोठमोठे खड्डे असल्यामुळे तसेच वळण रस्त्यावर कंत्राटदाराने दिशादर्शक फलक न लावल्यामुळे वाहनांचे अपघात होत आहेत
रस्त्याचे व पुलाचे काम करत असताना कंत्राटदाराने वळण रस्ता न काढल्यामुळे
माझ्या पुतण्याचा अपघात होऊन तो गंभीर जखमी झाला व अपघातानंतर तो सध्या मृत्यूशी झुंज देत आहे आम्ही त्याला तात्काळ दवाखान्यात दाखल केले
त्यामुळे वेळेवर उपचार मिळाल्यामुळे तो वाचला नाहीतर अनर्थ घडला असता संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्या लापरवाहीमुळे
किनवट ते मेंडकी रोडवर अनेकदा वाहनांचे अपघात होत असून पुतण्याच्या अपघातामुळे मला नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे
माझ्यावर ओढवलेल्या या परिस्थितीला संबंधित कंत्राटदार व अधिकारी जबाबदार असल्यामुळे त्यांच्यावर दखलपात्र कारवाई करून कामाची योग्यता तपासावी
तसेच रस्त्यावर मोठमोठे खड्डे ठेवून व वळण रस्ता न करता अपघातास जबाबदार ठरूऊन कंत्राटदारांवर दखलपात्र कारवाई करावी व नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करावी