Ticker

6/recent/ticker-posts

लोकनेते प्रकाश पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त मांडवी येथे स्मारक लोकार्पण सोहळ्याचे आयोजन


लोकनेते प्रकाश पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त मांडवी येथे स्मारक लोकार्पण सोहळ्याचे आयोजन                       
   (किनवट) लोकनेते बंजारा समाजाचे नायक स्वर्गीय प्रकाश बळीराम पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त प्रकाश पाटील महाविद्यालय मांडवी

 येथे ह भ प राधाताई महाराज सानप आईसाहेब यांच्या कीर्तनाचा कार्यक्रमासह नव्याने बांधण्यात आलेल्या 

त्यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा दिनांक 29 एप्रिल 2022 शुक्रवार रोजी हेमंत प्रकाश राठोड, प्रफुल्ल प्रकाश राठोड, 

सुनील प्रकाश राठोड व समस्त राठोड परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे .त्यांच्या प्रथम  स्मृती समारोह व स्मारक लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, 

उद्घाटक म्हणून खासदार हेमंत भाऊ पाटील,व मान्यवरांच्या उपस्तीत आयोजित केले आहे. सकाळच्या सत्रात  महाराष्ट्रातील प्रसिद्ध महिला कीर्तनकार ह. भ .प. राधाताई महाराज( सानप )

यांचे  प्रबोधनपर कीर्तनाचे कार्यक्रम सकाळी 09:00 वाजता , दुपारी11:00 वा.प्रथम स्मूर्ती समारोह व स्मारक लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.स्वर्गीय बळीराम पाटील माजी खासदार,मंत्री उत्तमरावजी राठोड 

यांचे राजकीय आणि सामाजिक वारसा पुढे चालू ठेवणारे लोकनेते सर्व जाती धर्मातील लोकांना निस्वार्थपणे न्यायदान करणारे नायक स्वर्गीय प्रकाश बळीराम पाटील 

यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन भाजप नेते प्रफुल्ल राठोड, भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारणी सदस्या सौ. संध्याताई राठोड यांनी केले आहे