Ticker

6/recent/ticker-posts

हादी ओरिएंटल इंग्लिश मीडियम शाळेच्या विद्यार्थ्यांनी केली दैनंदिन खर्चासाठी मिळणारी पाकीटमनी च्या पैशातून इफ्तार पार्टीचे आयोजन


हादी ओरिएंटल इंग्लिश मीडियम शाळेच्या विद्यार्थ्यांनी केली दैनंदिन खर्चासाठी मिळणारी पाकीटमनी च्या पैशातून इफ्तार पार्टीचे आयोजन

यवतमाळ (वासीक शेख) : जगातील सर्व धर्मांचे आपले एक विशेष कॅलेंडर असते त्या कॅलेंडरनुसार ते आपले सण साजरे करतात यातूनच इस्लाम धर्मामध्ये हिजरी कॅलेंडर प्रचलित आहे हे कॅलेंडर चंद्राचे परिक्रमा अनुसार असते त्या कॅलेंडरनुसार 9 वा महिना म्हणजे रमजानुल मुबारक अर्थात उपवासाचा महिना.

या महिन्यांमध्ये मुस्लिम समाजातील लहान-मोठे स्त्री-पुरुष सर्व वर्गातील लोक मोठ्या संख्येने उपवास ठेवतात. सकाळी चार वाजता उठून सहेरी म्हणजे सकाळच्या अल्पाहार करतात 

दिवसभर ना पाणी ना जेवण उपाशी राहून दिवसभरात पाच वेळा अल्लाहची भक्ती म्हणजे नमाज पठण करतात त्यानंतर संध्याकाळी सात वाजता इफ्तार च्या वेळी काही अल्पाहार करू उपास सोडतात 

या महिन्यात उपवास ठेवणारे व्यक्तीला इफ्तार च्या वेळी काही खाण्यासाठी देणे म्हणजे खूप पुण्याचा काम आहे सध्या सर्व जगात एप्रिल महिन्यापासून रमजान महिना सुरू झाला आहे.

रमजान महिन्याच्या या पावन पर्वावर यवतमाळ येथील राधिका लेआउट भोसा रोड वर स्थित तामीर ए उम्मत बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त रिता सुरू असलेली

 हादी ओरिएंटल इंग्लिश मीडियम स्कूल आणि डायमंड इंग्लिश मीडियम स्कूल च्या विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन खर्चासाठी मिळणारी पाकीटमनीतून पैशाची बचत करून 

बुधवार दिनांक 20 एप्रिल 2022 रोजी शाळेत इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.या दिवशी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उपवास ठेवला होता

 सकाळी 11 वाजेपासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत शाळेतील सर्व विद्यार्थी शाळेत उपस्थित होते संध्याकाळी 7 वाजता सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित बसून इफ्तार करून उपवास सोडले विद्यार्थ्यांचे 

या अभिनव उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे व सर्व स्तरावरून हादी ओरिएंटल इंग्लिश मीडियम स्कूल आणि डायमंड इंग्लिश मीडियम स्कूल च्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे

 या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ज़रीफ़ उर रहमान सर, वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे 

यवतमाळ जिल्हा सचिव वासीक जुबेर शेख,हादी ओरिएंटल इंग्लिश मीडियम स्कूल आणि डायमंड इंग्लिश मीडियम स्कूल चे संचालक मिर्ज़ा अतवार अहमद बेग तसेच तामीर ए उम्मत बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक स्वर्गीय डॉ.मिर्ज़ा निसार अहमद बेग 

यांची पत्नी आणि हादी ओरिएंटल इंग्लिश मीडियम स्कूल आणि डायमंड इंग्लिश मीडियम स्कूल चे संचालक मिर्ज़ा अतवार अहमद बेग 

यांची आई हिजाबुन्निसा बेग़म हे प्रामुख्याने उपस्थित होते.या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता शाळेचे प्राचार्य गजाला गिलानी मॅडम, 

सहाय्यक शिक्षक हिना खान मॅडम,हर्षा भगत मॅडम,सानिया सैय्यद मॅडम,शेख आफरीन मॅडम,शेख समीर,अज़गर अली आदिने अंतक परिश्रम घेतले.