हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हदगाव व हिमायतनगर येथे होणार स्व. हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अभ्यासिका केंद्र, व्यायामशाळा, वाचनालय, व सांस्कृतिक सभागृह.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे व नगर विकास मंत्री एकनाथ भाई शिंदे
यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून हदगाव नगरपरिषदेसाठी 2 कोटी व हिमायतनगर नगरपंचायत साठी 1 कोटीचा निधी मंजूर करून घेतला आहे.
स्पर्धेच्या युगात देशाची भावी पिढी सुद्धा मागे राहू नये
याकडे विशेष लक्ष दिले आहे अत्याधुनिक सोयी सुविधा युक्त अभ्यासिका केंद्र व्यायामशाळा, वाचनालय, व सांस्कृतिक सभागृह, होत असल्यामुळे ग्रामीण भागातून येऊन
शहरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे.
तसेच यापूर्वी हिंगोली, वसमत, कळमनुरी,
किनवट, येथे प्रत्येकी 2 कोटी रुपये निधी व सेनगाव येथे 1 कोटीचा निधी मंजूर करून घेतला आहे.