ॲंकर / ऐन उन्हाळ्यात वन्य प्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी फरपट आणि भटकंती थांबवावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून... ईस्लापुर वनविभागाने जंगलातील, हरीण, काळवीट, रोही ,रानडुकर, निलगाय, लांडगे कोल्हे, तरस, अस्वल अशा वन्य प्राण्यांची तहान भागवण्यासाठी
नांदेड वन विभागाचे उपवन संरक्षक केशव वाबळे व सहाय्यक वनसंरक्षक श्रीनिवास लखमावाड व
वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट तालुक्यातील चिखली अंदबोरी राखीव वन कक्ष क्रमांक 296
या राखील जंगलालगत असलेल्या अंदबोरीच्या नाल्यावर लोकसहभागातून वनराई बंधारा तयार करण्यात आलाय....
हा वनराई बंधारा तयार करण्यासाठी अंदबोरी येथील सरपंच प्रतिनिधी पोताजी उरे व गावातील नागरिक व वन अधिकारी व कर्मचारी
यांनी सहभाग नोंदवला असून या वनराई बंधाऱ्यामध्ये लाखो लिटर पाण्याची साठवण झाली असून जवळपास दोन ते तिन महिने
हा पाणीसाठा वन्यप्राण्यांची तहान भागवण्यासाठी पुरेल असा विश्वास वनपाल व्ही एस गुद्दे यांनी वर्तवलाय....
बाईट - व्हि एस गुद्दे.
(वनपाल वन परिक्षेत्र कार्यालय इस्लापूर.)