किनवट ( प्रतिनिधी ) . तालुक्यातील बोधडी वनपरिक्षेत्र अंतर्गत जंगलातील वन्यजीवांसाठी पाणवठे तयार करून त्यात टँकरद्वारे पाणी सोडले आहे .
त्यामुळे वन्यजीवांचे पिण्याचा पाण्याचा प्रश्न भर उन्हाळ्यात सध्या तरी सुटला आहे .
उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे उष्मांक वाढू लागला जिव लाही लाही होत आहे .
वाढत्या उन्हामुळे जंगलात वन्यप्राण्यांची पाण्याची काही भागात सोय नाही . पाण्यासाठी वन्य प्राण्यांची भटकंती होऊ नये
यासाठी बोधडी चे वनपरिक्षेत्राधिकारी श्रीकांत जाधव यांनी उपवनसंरक्षक केशव वाबळे, सहा . वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव ) श्रीनिवास लखमावाड
यांच्या मार्गदर्शनाखाली जंगल भागात वन्य प्राणी व इतर वन्यजीवांसाठी पाणवठे तयार करून त्यात टँकर द्वारे पाणी टाकले जात आहे .
पाणवठे भरून राहत असल्याने जंगलातील वन्यप्राणी मोठ्या संख्येने पाणी पीत आहेत .
या पानवट्या मूळे वन्य प्राण्यांची मानवी वस्तीकडे येण्याला रोख बसला आहे . हरिण, नीलगाय ,रोही , सांभार ,रानडुक्कर, अस्वल, काळवीट ,