किनवट:- किनवट ह्या आदिवासी तालुक्यात झालेल्या नक्षली कृृती तसेच मागील काळात समोर आलेल्या काही नक्षली हालचालींच्या पार्श्वभुमिवर आदिवासी किनवट तालुका हा नक्षलग्रस्त
यादीतून न वगळता यादीत तसाच कायम ठेवण्याच्या मागणीचे निवेदन आ. केराम यांनी मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्र्यांना दिले आहे.
दि.१९ एप्रिल रोजी किनवट/माहूर चे आमदार भिमराव केराम यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांना लेखी निवेदन देवून सदरची मागणी केली आहे.
दरम्यान या निवेदनाला गृह विभागाचे उपसचिव यांचे पत्र क्र. एनएएक्स-१२२०/प्र.क्र.२५३/विशा-१ ब दिनांक १३/०४/२०२२ चा संदर्भ देवून असे म्हटले आहे की, तेलगंणा राज्य सिमेलगत घनदाट जंगलात
किनवट हा आदिवासी तालूका
असून भोगोलिकदृष्टया विस्ताराने अधिक मोठा आहे. मागील काही वर्षांपूर्वी या तालूक्यात नक्षलवादी कारवाया झाल्या असून,
या भागात नक्षली कमांडर विजय कुमार नामक कुख्यात नक्षलवाद्याने धूमाकुळ घातला होता. तो सन १९९२ साली ‘जूना पाणी’ ( ता. माहूर ) या जंगलात पोलीस चकमकीत मारला गेला.
तद्नंतर काही काळानंतर
या भागात नक्षली कारवाया तसेच हालचाली पुन्हा सुरु असल्याचे वृत्त अनेक वर्तमान पत्रातून प्रसिद्ध झाले तसेच प्रत्यक्ष ऐकावयासही मिळाले.
दरम्यान या भागात शस्त्रधारी नक्षली आजही जंगलात बिनदिक्कतपणे फिरत असल्याची कुजबूज जनतेत होत असून या बाबत कोणत्याही प्रकारची खबरबात पोलिसांना सांगण्यास स्थानिक लोक घाबरतात.
याचे प्रमुख कारण म्हणजे पोलिसांच्या खब-यांना नक्षलवाद्यांनी अमानुषपणे तुकडे करूण मागील काळात जिवाने मारले होते.
हिच ती दहशत असून आजही तेलगंणा, विदर्भ सिमेवरून या भागात नक्षवाद्यांच्या हालचाली व असलेला वावर नाकारता येत नाही.
तर किनवट हा आदिवासी, नक्षलग्रस्त भाग जिल्हायाच्या ठिकाणाहून सुमारे १५० कि. मी. अंतरावर असून मागिल नक्षली कारवायाची दहशत व चकमक माहित असल्याकारणाने
या भागात अधिकारी / कर्मचारी सेवा देण्यासाठी आजही धजावत नसून केवळ नक्षलीभागाच्या वेतनात जास्तीचे वेतन भत्ते मिळत असल्याने ते या विभागात सेवा देत असल्याचे वास्तव आहे..
यामुळेच या भागात C-४७ पोलिस कार्यालयाची स्थापना झाली आहे.
एकंदरीतच विदर्भ/तेलंगणा राज्यातील मागील काळात झालेल्या तसेच संभाव्य नक्षली कारवाया लक्षात घेवून भविष्यात या भागात नक्षली हालचाली वाढून विद्रोही अनुचित प्रकार घडू नये
यासाठी नांदेड जिल्हातील आदिवासी किनवट तालूका हा भाग नक्षलग्रस्त यादीतून न वगळता यादीत कायम ठेवावा अशी लिखीत मागणी आमदार भिमरावजी केराम यांनी केली आहे