गोदावरी फाउंडेशनच्या वतीने हिंगोली येथे आज संवादिनी मेळावा
हिंगोली /नांदेड :गोदावरी फाउंडेशन हिंगोली यांच्यावतीने आज ( दि. ९ एप्रिल ) रोजी हिंगोली मध्ये प्रथमच महिलांसाठी ज्ञान आणि मनोरंजनात्मक अश्या विविधांगांनी नटलेल्या संवादिनी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे .
या कार्यक्रमासाठी पुणे येथील प्रसिद्ध कायदेतज्ञ तथा महिला सल्लागार ऍड . रमा सरोदे यांची मार्गदर्शक म्हणून उपस्थिती लाभणार असून गोदावरी फाउंडेशनच्या अध्यक्षा राजश्री पाटील , सचिव धनंजय तांबेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे .
दररोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून महिलांना थोडा विरंगुळा मिळावा, संसाराचा गाडा ओढत असताना स्वतःमधील सुप्त गुणांना वाव मिळावा मोकळ्या मनाने कुठेतरी व्यक्त होता यावं
या उद्देशाने गोदावरी फाऊंडेशनच्या अध्यक्षा राजश्री पाटील,यांच्या संकल्पनेतून हिंगोली शहरात प्रथमच महिलांसाठी संवादिनी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. ९ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता येथील स्व. शिवाजीराव देशमुख सभागृहात हा कार्यक्र्म होणार आहे . यादरम्यान मेळाव्यामध्ये महिलांसाठी अंताक्षरी, उखाणे , रॅम्पवॉक मनोरंजनाचे विविध खेळ आणि स्पर्धा घेण्यात येणार आहे
व स्पर्धेतील विजेत्याना मान्यवरांच्या हस्ते विशेष प्रोत्साहनपर खण साडी,प्रमाणपत्र व विविध बक्षीस देण्यात येणार आहेत . मनोरंजनासोबतच महिलांच्या ज्ञानात भर पडावी याकरिता कार्यक्रमात ऍड . रमा सरोदे महिलाविषयक कायदे आणि
इतर विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत तर राजश्री पाटील या महिला सक्षमीकरण या विषयावर महिलांशी संवाद साधणार आहेत . ज्ञान आणि मनोरंजनाच्या या संवादिनी मेळाव्याचा हिंगोली जिल्ह्यातील
सर्व महिलांनी लाभ घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व स्पर्धेतील विविध बक्षिसांची लयलूट करावी असे आवाहन गोदावरी फाऊंडेशनच्या माध्यमातून अध्यक्षा राजश्री पाटील , सचिव धनंजय तांबेकर हिंगोली जिल्हा समन्वयक शिवाजी पातळे, सोनल सुलभेवार व नैना पैठणकर यांनी केले आहे.