Ticker

6/recent/ticker-posts

किनवट = (तालुका प्रतिनिधी) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी किनवटच्या चेअरमनपदी काँग्रेसचे नेते व्यंकटराव नेम्मानीवार यांचे चिरंजीव कृष्णकुमार नेम्मानीवार यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांचा काँग्रेस पक्ष वर्तुळात स्वागत करण्यात येत आहे


विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी कृष्णकुमार व्यंकटराव नेम्मानीवार
किनवट = (तालुका प्रतिनिधी) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी किनवटच्या चेअरमनपदी काँग्रेसचे नेते व्यंकटराव नेम्मानीवार यांचे चिरंजीव कृष्णकुमार नेम्मानीवार यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांचा काँग्रेस पक्ष वर्तुळात स्वागत करण्यात येत आहे.


याविषयी सविस्तर माहिती अशी की, गेल्या पंचवीस वर्षापासून सदर सोसायटी ही काँग्रेसच्या ताब्यात होती आणि याहीवर्षी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी किनवटवर काँग्रेसचे नेते तथा माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेम्मानीवार  

यांचेच वर्चस्व राहिले असून सदर सदर सोसायटीवर काँग्रेसचेच 12 उमेदवार बिनविरोध निवडून येत एकहाती सत्ता मिळवली आहे. 

आणि दि. अकरा ११ एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकीत सदर सोसायटीवर काँग्रेसचाच झेंडा फडकवण्यात नेम्मानीवार यांना यश आले आणि कृष्णकुमार व्यंकटराव नेम्मानीवार हे चेअरमनपदी विराजमान झाले.

 या निवडीबद्दल नांदेडचे आमदार तथा काँग्रेसनेते अमर राजूरकर, नांदेड जिल्हा अध्यक्ष गोविंदराव नागेलीकर, पणन महासंघाचे व काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष नामदेवराव केशवे, नविन राठोड, 

किनवट/माहूर तालुक्यातले काँग्रेसचेनेते यादव लिंबाजी जाधव, तालुका अध्यक्ष सूर्यकांत रेड्डी, नवीन जाधव, नगरसेवक अभय महाजन, माजी नगराध्यक्ष के मूर्ती,

 नरसिंगराव सातुरवार, गोविंदराव नेम्मानीवार, पिसारीवार, माजी नगरसेवक लक्ष्मीपती दोनपेल्लीवार, बशीरोद्दीन, महिला अध्यक्षा शहानवाज, प्रीती मुनेश्वर, दिलीप पाटील इत्यादी

 किनवट माहूर तालुक्यातील काँग्रेस चे पदाधिकारी कार्यकर्ते व अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी या निवडीचे भरभरून कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.