Ticker

6/recent/ticker-posts

संग्रामपूर पं स मध्ये वानखेड येथील पाणी प्रश्नावर बैठक आठ दिवसांत स्वच्छ पाणी पुरवठा करणार असल्याचे लेखी पत्राने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाची सांगता संग्रामपूर जळगाव जामोद मतदार संघामध्ये किडनी स्टोन रुग्णांची संख्या ही सर्वाधिक असल्यामुळे

 या परिसरातील अनेक ठिकाणी व काही भागातील नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी शासनाने 140 गाव पाणी पुरवठा योजना सुरू केली

 परंतु मतदार संघामध्ये बर्याचशा गावामध्ये आज पर्यंत स्वच्छ पाण्याचा पुरवठा होत नसल्याने 

स्वाभिमानी चे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले आहेत गेल्या अनेक दिवसांपासून वानखेड गावातील नागरिकांना दुषित पाणी प्यावे लागत आहे 

गावाची लोकसंख्या पाहता गावातील पाण्याची टाकी ही लहान आहे 

यामुळे नागरिकांना योग्य प्रमाणात स्वच्छ पाण्याचा पुरवठा होत नाही वानखेड गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे 

ही बाब लक्षात घेता च स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निदर्शने केली

 13 एप्रिल रोजी निवेदन देऊन संबंधित विभागाला 19 एप्रिल रोजी आंदोलनाचा इशारा दिला

 यामुळे शेतकरी संघटनेचे नेते व पदाधिकारी 
उपस्थित होते

 जिल्हा प्रतिनिधी गजानन धंदरे बुलढाणा जिल्ह्यातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क 9850835306