Ticker

6/recent/ticker-posts

किनवट/प्रतिनिधी- मागील काळात किनवट नगर परिषदेचे पदाधिकारी,अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी केलेल्या विकास कामातील गैर व्यवहारावर आरोप करत चालू वर्षी आदिवासी उपयोजनेअंतर्गत प्रस्तावित १ कोटी ९१ लक्ष रुपयांची विकास कामे दर्जेदार करण्यासाठी ही कामे कार्यकारी अभियंता बांधकाम


किनवट/प्रतिनिधी- मागील काळात किनवट नगर परिषदेचे पदाधिकारी,अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी केलेल्या विकास कामातील गैर व्यवहारावर आरोप करत चालू वर्षी आदिवासी उपयोजनेअंतर्गत  प्रस्तावित १ कोटी ९१ लक्ष रुपयांची विकास कामे दर्जेदार करण्यासाठी ही कामे कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग,

  कार्यकारी अभियंता महावितरण यांच्या नियंत्रणाखाली व देखरेखीखाली करावीत असे लेखी निवेदन भाजपाच्या नगरसेविका जिजाबाई मेश्राम 

यांनी राज्याचे नगरविकास मंत्री प्राजक्त तनपुरे यांना दिले आहे.  या निवेदनामुळे सत्ताधारी भाजपला भाजपच्याच नगरसेविकेने घरचा आहेर दिल्याने चर्चेला उधाण आले.
           
  नगरसेविका जिजाबाई मेश्राम यांनी निवेदनात नमूद केले आहे की, किनवट नगरपरिषद ही आदिवासी उपयोजनेत समाविष्ट असल्यामुळे किनवट शहराच्या विकासासाठी राज्य शासन,

 केंद्र शासन तसेच आदिवासी विभागाकडून मूलभूत विकास कामासाठी दरवर्षीच कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होत असतो परंतु नगरपालिकेचे काही पदाधिकारी,नगरसेवक हे  बांधकाम अभियंता
 तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून स्वताच कामे करत असल्यामुळे अत्यंत दर्जाहीन कामे होत आहेत. यापूर्वी आदिवासी वस्ती सुधार योजनेअंतर्गत 

 प्रभाग क्र. १ मधील सिमेंट रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असून या रस्त्यासाठी अत्यंत हलक्या दर्जाचे सिमेंट, माती मिश्रित वाळूचा वापर केल्यामुळे व  क्युरिंग न केल्यामुळे अल्पशा काळामध्ये हा सिमेंट रस्ता पूर्णतः उघडून जागोजागी खड्डे पडले आहेत 

यात नाली बांधकामाचा समावेश असतानादेखील नाली बांधकाम न केल्यामुळे जागोजागी सांडपाणी साचून दुर्गंधी पसरत आहे सिमेंट रस्ताच नव्हे तर यापूर्वीच्या अनेक विकास कामांचे पदाधिकारी, नगरसेवक,बांधकाम अभियंता यांच्या गुत्तेदारी धोरणामुळे विकास कामांची  तीन-तेरा वाजल्या चा आरोप केला आहे.
            

   विकासकामे करत असताना न प चे अधिकारी ,अभियंता हे  पदाधिकाऱ्यांच्या दबावाखाली कामाचा दर्जा न तपासता निकृष्ट कामाची बिले अदा करत असल्यामुळे विकास निधीचा अपव्यय होत आहे सध्या स्थितीत महाराष्ट्र शासनाच्यावतीने शहरी भागाची आदिवासी वस्ती सुधार योजना अंतर्गत 

दि. २४ मार्च २०२१ रोजी  एसटीबीटी, नाली, सौर पथदिवे बसविणे, नदीस संरक्षण भिंत उभारणे अशी एकून १ कोटी ९१ लाख ०७, १४३ रु ची कामे प्रस्तावित असून  या कामासंदर्भात नकाशे  तयार करण्याचे काम सुरू आहे.  

दरम्यान या निधीवर डोळा ठेवून काही पदाधिकारी, नगरसेवक आतापासूनच स्वतः कामे करण्याची तयारी करत असून  पूर्वीप्रमाणे ही कामे सुद्धा पदाधिकारी व नगरसेवकांच्या  नियंत्रणाखाली गेल्यास निधीची 

मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होऊन दर्जाहीन कामे होण्याची भीती नगरसेविका जिजाबाई मेश्राम यांनी व्यक्त केली आहे.
                   
त्यामुळे  आदिवासी उपयोजना अंतर्गतची प्रस्तावित कोट्यवधी ची कामे अंदाज पत्रकाप्रमाणे व दर्जेदार व्हावीत यासाठी ही कामे अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर व कार्यकारी अभियंता महावितरण यांच्या नियंत्रणाखाली व देखरेखीखाली करावीत

 त्याचबरोबर प्रभाग क्र. १  मधील निकृष्ट दर्जाच्या सिमेंट रस्त्याची व नाली बांधकामाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नगरसेविका जिजाबाई मेश्राम यांनी केली आहे 

यासंदर्भात वरिष्ठ स्तरावरून कार्यवाही न झाल्यास दि. २५ एप्रील रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांच्या कार्यालयासमोर  आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील त्यांनी निवेदनातून दिला आहे. 

निवेदनाच्या प्रती सर्व संबंधितांना पाठविल्या आहेत दरम्यान विकास कामावरून नेहमीच वादग्रस्त ठरणाऱ्या

 किनवट नगरपालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेविका जिजाबाई मेश्राम यांनी नगरपालिकेतील भ्रष्ट कारभाराची तक्रार देऊन घरचा आहेर दिल्याच्या चर्चेला सर्वत्र उधाण आले आहे.