बच्चु कडूंची भोंग्याच्या वादात उडी; राजकीय सभेतले भोंगेही...मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. यानंतर राज्यात भोंग्याचा वाद चांगलाच पेटला आहे. या भोंग्याच्या वादावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यातच आता राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu kadu) यांनी भोंग्यावर मोठे विधान केले आहे.
राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu kadu) यां नी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे मोठं विधान केले आहे.
यावेळी त्यांनी भोंग्याच्या विषयावर बोलताना,
दोन वर्षे कोरोनामुळे सर्व मंदिर,बौद्ध विहार,
मशिदीमधील भोंगे बंद होते. त्यावेळी फक्त रुग्णवाहिकेचा भोंगा सुरू होता, असे सांगितले.
तसेच देश सध्या कशा परिस्थितीत आहे. त्यामुळे इतर मुद्दे बाजूला सारून वेगळे मुद्दे मांडले जात असल्याचा आरोप केला.