किनवट :-येथे वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी घटना घडल्याचे प्रकरण उजेडात आले असून शरयू हॉस्पिटलचे डॉक्टर विकास सुंकूरवाड यांनी कामासाठी ठेवलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुली सोबत तब्बल बारा वेळेस बळजबरी संभोग केल्याने सदर अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली आणि
दिनांक 6/5/2022 रोजी तिचा गर्भपात करण्यात आला. याबद्दलची तक्रार सदर पीडित मुलीने किनवट पोलीस स्टेशनला दिली आहे.
त्यावर 376,( 2)(1) (एन) 506 सहकलम 4,6,पोक्सो अँक्ट प्रमाणे सदर डॉक्टरावर गुन्हा दाखल करण्यात आला.
या खळबळजनक घटनेची तपशीलवार
माहिती अशी की, तक्रारदार मुलगी ही धोबी गल्ली किनवट येथे वास्तव्यास असून गरिबी आणि बिकट परिस्थितीमुळे ती नोव्हेंबर 2019 पासून ते मार्च 2022 पर्यंत सदर
अल्पवयीन मुलगी डॉक्टर विकास सुंकलवाड यांच्या शरयु हॉस्पिटलमध्ये सफाईगार म्हणून 2000 रुपये प्रति महिना पगारी वर कामास होती.
पण सदर असाह्य मुलीवर सदर डॉक्टराची पापी नजर पडली अन त्या नीच डॉक्टरांने सतत दिवस व रात्रीच्या बारा वेळेस
अतिप्रसंग करत संभोग करत आपली कुवासना भागवली. अश्या आपल्या लेखी तक्रारीत मुलीने नमूद केले आहे.
या अशा प्रसंगाला कंटाळून व हा प्रसंग कोणाला सांगशील तर जिवे मारून टाकीन अशी धमकी दिल्यामुळे सदर मुलीने तेथील काम बंद केले.
आणि 6,5,2022 रोजी तिच्या पोटात वेदना होत होत्या म्हणून तिने डॉक्टर व लँब येथे तपासणीसाठी गेली होती
व तेथेच तिचा गर्भपात झाला पण अंदाजे पाच ते सहा महिन्याचा गर्भपात कसा झाला हा प्रश्न पडत असून त्याचीही चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. डॉक्टर पेशाला काळीमा फासणाऱ्या
या घटनेमुळे शहरात व वैद्यकिय वर्तुळात खळबळ माजली आहे. देवाचे रूप म्हणून समाजात प्रतिष्ठेने ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टरांकडूनच
असा नीच काळिमा फासणाऱ्या घटना होत असतील तर विश्वास कुणावर करायचा हा मोठा प्रश्न पडला आहे.