अशा महान धर्मवीरास ..अखेरचा हा तुम्हा दंडवत..!
ठाण्याचे प्रति बाळासाहेब ठाकरे म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेब! 1995 मध्ये तेव्हा मी बीएससी सेकंड इयर ला होतो. वंदनीय शिवचरित्रकार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्येकाच्या घराघरात, मनात नाही तर परदेशातही पोचले असे कै. बाबासाहेब पुरंदरे लिखित "जाणता राजा"
या नाटकात काम करण्यास संधी मिळाली त्या निमित्य सोलापुरातही दहा प्रयोग झालेले पहिले पाच प्रयोग कै. विजयराव मुळीक यांनी घेतले तर दुसरे पाच प्रयोग कै. ब्रह्मदेव दादा माने यांनी घेतले होते. त्यानंतर पुढच्या प्रयोगासाठी ठाणे
येथे जाण्याचा योग आला हे आमचे भाग्यच होते असेच म्हणावे लागेल. अशा महान व्यक्तींनी प्रयोग घेतले होते ते म्हणजे धर्मवीर कै.आनंद दिघे साहेब
त्यांनी जवळपास पंचवीस प्रयोग घेतले त्यानिमित्त एक महिना दादाजी कोंडदेव स्टेडियम ठाणे येथे प्रयोगाचे आयोजन केले होते .तेथेच राहण्याची पण व्यवस्था केली होती. आम्ही त्यांना आदराने "आनंद काका" म्हणायचो!
साधी राहणी उच्च विचारसरणी मी स्वतः अनुभवली. सकाळी निवांत तसेच संध्याकाळी प्रयोग असायचे त्यामुळे रोज आनंद काका रिकामा वेळ असेल तेव्हा रोज
आमच्या सोबत गप्पा मारायचे ,भेटायचे चौकशी करायचे जेवण झाले का विचाराचे! कधीकधी आमच्यासोबत जेवण किंवा नाश्ता पण करायचे आणि दिलखुलास गप्पा मारायचे त्यांचे एकच ध्येय होते की शिवचरित्र प्रत्येकाच्या घराघरात पोहोचले पाहिजे आणि आम्ही सकाळी जेव्हा
ठाणे शहर फिरायचो तेव्हा शहरातील प्रत्येक चौकातील दुकानात त्यांचा फोटो पाहिला होता . त्यानंतर खूपच उत्सुकता वाढली आणि एक दिवस त्यांचा टेंभे नाका
येथील "जनता दरबार "पण कसा असतो ते पाहायला गेलो तर आम्ही स्वतः पाहिले लोक देवांला नाही तर त्यांच्या दरवाजाला मोठ्या नारळाची तोरणे बांधले होते! कारण का तर आनंद काका लगेच न्याय निवडा करायचे ;कोणी गरज वाले त्यांना तात्काळ मदत करायची ;कोणी लग्नाची निमंत्रण पत्रिका घेऊन आले की लगेच त्यांना आहेर देऊन टाकायचे
हे आम्ही स्वतः डोळ्यांनी पहिले जर कुणाचे पाकीट मारले असेल तर लगेच त्याची तात्काळ चौकशी करायची आणि त्याला जेवण वगैरे खाऊ घालून त्याची जायची व्यवस्था करायची ते पण लगेच तात्काळ अस त्यांच काम होते.
कुणावर अन्याय झालेला आनंद काकांना सहन व्हायचा नाही लगेच न्यायनिवाडा करायचे मी पण खूपच भारावून गेलो त्यांना अटक झाली
तर चौथीची मुले आमच्या काकांना सोडा म्हणून मोर्चात सहभागी व्हायचे हे पण लोक सांगत होते मी देव आहे का नाही माहित नाही पण ठाण्याचा देवमाणूस नक्कीच पहिला! आनंद काकांना
एक दिवशी मी गप्पा मारताना आपण फोटो काढू काका असे म्हंटले तर मला थांब छान पैकी पोझ देऊन फोटो काढू म्हणत हा खाली दिलेला 1995 चा फोटो आहे आमचे खूप मोठे भाग्य आहे की अशा प्रतिभासंपन्न महान व्यक्तिमत्वांची भेट झाली आणि
एक महिना त्यांचा सहवास लाभला त्यांची कीर्ती सदैव सर्वत्र कळणे गरजेचे आहे त्यानिमित्त आज "धर्मवीर ..हा चित्रपट प्रदर्शित होत आहे खूप आनंद वाटला.
देशासाठी आणि धर्मासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या अनेका मधील ते एक भगवा ध्वज खांद्यावर घेऊन लखलखत्या सूर्याप्रमाणे त्यांचे कर्तव्य सर्वश्रुत होते अश्या महान धर्मविरास अखेरचा हा तुम्हा दंडवत!*