आज दि.22.11.21 रोजी विज महावीतरण उपविभागीय कार्यालय, किनवट येथे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा तर्फे विजवीतरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला. विजवितरणाकडून शेतकऱ्यांची शेतातील वीज तोडणी सुरू आहे.
रब्बी पेरणी साठी,शेतकऱ्यांना पिकांसाठी पाण्याची आवश्यकता असतांना वीज तोडणी तात्काळ थांबवावी
या मागणीसाठी किसानमोर्चा प्रदेश सरचिटणीस मा. सुधाकरराव भोयर, मा. प्रफुल्ल राठोड साहेब, सौ. संध्याताई प्रफुल्ल राठोड(प्रदेश कार्यकारणी सदस्य)
राघू मामा, दिपक नेमानिवार, श्रीनिवास राठोड,आत्माराम मुंडे,उमाकांत कराळे, भावना दीक्षित यांनी उपअभियंता यांना निवेदन दिले.
या प्रसंगी परिसरातील सर्व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्तीत होते. या मोर्चा प्रसंगी उपअभियंता साहेबांनी तातडीने वीज तोडणीतात्काळ थांबवू असे आश्वासन दिले.
::महावीतरणाविरोधात निषेध आंदोलन::
महावीतरणाने 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटिस पाठवून महाराष्ट्रातील 4 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणाऱ्या महावितरणाच्या निषेधार्थ
शुक्रवार दि. 5 फेब्रुवारी, 2021 रोजी भारतीय जनता पक्षाच्या मांडवी परिसरातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मांडवी
येथील MSEB कार्यालयावर निषेध आंदोलन करण्यात आले, या मोर्चाचे आयोजन व नियोजन "सौ.संध्याताई प्रफुल्ल राठोड"
(भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्या) यांनी केले. यावेळी आमदार मा. श्री. भीमराव केराम व श्री. प्रफुल्ल राठोड (किनवट - माहूर लोकनेते) यांची प्रमुख उपस्थिती होती.या मोर्चामध्ये मांडवी परिसरातील सर्व भाजपा पदाधिकारी सहभागी झाले होते.
.