Ticker

6/recent/ticker-posts

किनवट तालुक्यातील मांडवी येथे दिनांक 23/05/2022रोजी सोमवार सध्याकाळी 6.30वाजता मांडवी येथील कोठारी पॉईंट वरील नंदुरबार या बारवर धाड टाकली असता बार मालक धनलाल दुधलाल पवार यांचा बार मध्ये जन्ना मन्ना या नावाचा जुगार खेळ खेळत व खेळवित होते

मांडवी येथे जुगार अड्ड्यावर धाड रोड रक्कमेसह सहा वाहने जप्त


 मांडवी प्रतिनिधी
 किनवट तालुक्यातील मांडवी येथे दिनांक 23/05/2022रोजी सोमवार सध्याकाळी 6.30वाजता मांडवी येथील कोठारी पॉईंट वरील नंदुरबार या बारवर धाड टाकली असता बार मालक धनलाल दुधलाल पवार यांचा बार मध्ये  जन्ना मन्ना या नावाचा जुगार खेळ खेळत व खेळवित  होते

 अशी गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीस ठाणे मांडवी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नांदेड यांच्या संयुक्त कारवाईने ही( रेड) धाड टाकण्यात आली यावेळी त्यांची तपासणी केली असता

 त्यांच्या ताब्यातून  व अंगझडतीतून  रोख रक्कम 1,46,720 रू व 22,15,500 रुपये अशी रक्कम व त्याचे चारचाकी वाहनं 6 गड्या अशी साहित्य असे एकूण 23,61,720,रुपये च्या मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 यावरून मांडवी पोलीस ठाणे येथे गुन्हा. र.न.39/2022कलम12 (अ)  महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे
 

सदर कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखा मधील पोलिस कॉ.2140.शेख चाँद पो.हे का.सुरेश घुगे 2144 व पोलीस ठाणे मांडवी  सहाय्यक पोलीस निरीक्षक  शिवरकर पोलीस उपनिरीक्षक शिवप्रसाद कराळे पोलीस उपनिरीक्षक पठाण साहेब. 

पो. पोलीस कॉ.29 मडावी, पोलीस कॉ.166 कोडपवार ,पोलीस कॉ.3116चुनोडे पोलीस कॉ.1445 मोहुले , 

पोलीस का.745 जाधव, यानी संयुक्त कारवाई करण्यात आली सदर कारवाई पोलीस अधीक्षक साहेब नांदेड अप्पर पोलीस अधीक्षक साहेब भोकर 

व माननीय उपविभागीय पोलिस अधीक्षक किनवट पोलीस निरीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली अशी मांडणी पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले