गणेशपुरच्या माता-पालक गटाची आकाशवाणीवर मुलाखत
किनवट : शाळापूर्व तयारी शाळेतले पहिले पाऊल या कार्यक्रमा अंतर्गत तालुक्यातील कमठाला केंद्रातील गणेशपूर येथील माता-पालक गटाची मुलाखत नागपूर आकाशवाणी ( 585 KHz / 512.8 मी.)
वरून दि. 2, 4 व 7 जून 2022 या तीन दिवसी सलग तीन भागांमध्ये सकाळी 10.30 वा. होणार प्रसारीत होणार आहे. हा तालुक्याच्या शिरपेचातील एक मानाचा तुरा आहे.
2 जून रोजी माता पालक गटाच्या लीडर माता सरस्वती मोहजे, सदस्या रेणुका नांदे व संगीता खटारे, 4 जून रोजी कल्पना बावणे आणि 7 जून रोजी गट स्वयंसेवक दिव्या मोहिते यांची मुलाखत प्रसारित होईल.
कोविड-19 मुळे मागील दोन वर्षात अंगणवाडी व प्राथमिक शाळा पूर्णपणे बंद होत्या. या स्तरावरील विद्यार्थ्यांना अंगणवाडी व शालेय वातावरणाचा अनुभव घेण्याची संधी मिळाली नाही. ही बाब विचारात घेता महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने प्रथम
या अशासकीय संस्थेसोबत सामंजस्य करार करून जून 2022 मध्ये इयत्ता पहिलीला प्रवेश पात्र विद्यार्थ्यांसाठी शाळापूर्व तयारी शाळेतले पहिले पाऊल या महत्वकांक्षी कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्यभर निश्चित केली आहे.
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहाने शाळापूर्व तयारी पहिला मेळावा आयोजित करण्यात आला.
शारीरिक, सामाजिक, भावनिक, भाषिक, गणितीय इत्यादी क्षमतांचे निरीक्षण या माध्यमातून करण्यात आले.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याकडून तयार करण्यात आलेल्या आयडिया कार्ड, कृतीपत्रिका, शाळेतले पहिले पाऊल या साहित्याचे वितरण माता पालक व गटांना करण्यात आले.
लीडर माता व गटातील माता सदस्य आयडिया कार्ड वर चर्चा करून स्वयंसेवकांची मदत घेऊन आपापल्या पाल्याकडून आठवडानिहाय कृती पत्रिकेवरील कृती करून घेत आहेत.
तालुक्यातील माता पालकांची ही कामगिरी पंचक्रोशीत पसरली असून नागपूर आकाशवाणी यांनी एका माता-पालक गटाची मुलाखत घेतली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर - घुगे, डायटचे प्राचार्य रवींद्र आंबेकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ. सविता बिरगे, संचालक एम. डी. सिंह, सहसंचालक रमाकांत काठमोरे,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे उपसंचालक तथा राज्यस्तरीय कार्यक्रम अधिकारी डॉ. नेहा बेलसरे यांनी कौतुक केले आहे.
प्रथम संस्थेचे राज्य प्रमुख सोमराज गिरडकर, नांदेड जिल्ह्याचे प्रमुख महसुद्दीन, सबिहा, नाझीरा हे सर्वजण मदतीला वेळोवेळी धावून येतात.
या मुलाखतीसाठी मराठवाडा विभागाचे प्रथमचे प्रमुख शंकर पौळ यांनी ड्राय रन घेतला तर तालुका संपर्क अधिकारी अभयसिंह परिहार यांनी माता गटाला मुलाखती बाबत मार्गदर्शन केले.
गटशिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने, बाल विकास प्रकल्प अधिकारी अश्विनी ठकरोड यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार अधिकारी मनीषा बडगिरे, केंद्रप्रमुख शरद कुरुंदकर,