महाराष्ट्र ग्रामिण बँकें मार्फत नांदेड जिल्ह्यातील 856 समूहांना 10 कोटी 12 लाख रु कर्ज मंजूर, नांदेड जिल्हा राज्यात अव्वल
आज दिनांक 27/5/2022 रोजी महाराष्ट्र ग्रामिण बँक व उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य स्तरीय बँक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
सदर मेळाव्या अंतर्गत माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांच्या सूचनेनुसार आजादी का अमृत महोत्सव व महाजीवीका अभियान अंतर्गत
नांदेड जिल्ह्यातील 856 समूहांना 10 कोटी 12 लक्ष रुपये कर्ज मंजूर करण्यात आले.या कार्यक्रमास महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कार्यकारी संचालक मा.श्री विजयकुमार सर ,
मा.श्री हेमंत वसेकर सर मुख्य कार्यकारी अधिकारी एमएसआरएलएम हे VC द्वारे औरंगाबाद येथून उपस्थित होते.तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व उमेद अभियानाचे अधिकारी व समूहाच्या महिला ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे उपस्थित होते
या प्रसंगी नांदेड जिल्ह्यातील 5 समूहांना प्रातिनिधिक स्वरूपात मा. विभागीय व्यवस्थापक श्री कुलकर्णी सर यांच्या हस्ते मंजूरी पत्राचे वाटप करण्यात आले.
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद श्रीमती वर्षा ठाकूर, मा. डॉ. श्री. संजय तुबाकले अतिरक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प.नांदेड यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त समूहांना कर्ज वाटप करण्याच्या सूचना दिल्या .
या बँक मेळाव्यास तसेच नांदेड येथून या कार्यक्रमास महाराष्ट्र ग्रामिण बँकेचे विभागीय व्यवस्थापक मा.श्री. कुलकर्णी सर ,मा.श्री गजानन पातेवार जिल्हा अभियान व्यवस्थापक,
श्री माधव भिसे जिल्हा व्यवस्थापक आर्थिक समावेशन, तालुका व्यवस्थापक एफ.आय, अर्धापुर नांदेड मुदखेड येथील समूहा चे अध्यक्ष सचिव ICRP Banksakhi हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री पालीवाल ,व्यवस्थापक एम जी बी बँक,श्री प्रकाश कांबळे नांदेड ,जिल्ह्यातील एमजीबी बँकेचे सर्व शाखा अधिकारी तसेच जिल्हा अभियान कक्ष नांदेड येथील
श्री द्वारकदास राठोड जिल्हा व्यवस्थापक सामाजिक समावेशन, श्री धनंजय भिसे जिल्हा व्यवस्थापक मार्केटिंग, श्री गणेश कवडेवार जिल्हा व्यवस्थापक एमआयएस ,