जि.प.पाणीपुरवठा विभागाच्या उप-अभियंत्याची तात्काळ बदली करा - सामाजिक कार्यकर्ते संदिप नखाते किनवट = (तालुका प्रतिनिधी)
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे उप- अभियंता
त्यांच्या अनियमित कामाने कळस गाठला असून किनवट आदिवासी तालुका हा आदिवासी पैसाक्षेत्र असून आदिवासी बहूल समाज असून संबंधीत अधिकऱ्याची येथून तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणीही केली जात आहे.
सदर उप-अभियंता हे आदिवासी समाजाच्या विकासाच्या दृष्टीकोणातून निरुउत्साही आहेत.
मागील आर्थीक वर्षात यांंनी टंचाईचे कामे केली नसल्याने शासनाचा निधी परत केला सामाजिक कार्यकर्ते सरपंच, ग्रामसेवक
यांच्या सततच्या तक्रारीमुळे मागील वर्षी ग्रामसेवक संघटना, सरपंच संघटना यांच्या गंभीर तक्रारीवरून त्यांची बदली चंद्रपूर येथे झाली होती. त्यांनी वरिष्ठ् पातळीवर धाव घेवून स्थगिती मिळविली,
पुन्हा सुढबुध्दीने आदिवासी समाजास त्रास देण्याच्या उद्देशाने किनवट येथे पुन्हा रुजू झाले पुन्हा तालुक्यातील विकासकामांना खिळ बसली आहे. सद्या परिस्थीतीत तिव्र उन्हामुळे पाणी टंचाई,
जलजीवन मिशन अंतर्गत कामे मग्रारोहयोची कामेही विकास कामे 15 वित्त आयोग पैसा योजना अंतर्गत विकास कामावर परिणाम होत आहे. दि. 01 एप्रिल 2004 रोजी
किनवट येथे उपस्थित झाल्यापासुन तालुक्यातील विकासकामांना त्यांनी भेटीच दिल्य्या नाहीत व विकासकामाच्या मोजमाप पुस्तिकेवर स्वाक्षरी सुध्दा केले नाहीत
त्यामुळे तक्रारी वाढत आहेत. भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता ते उत्तर देत नाहीत. कार्यालयातही अभावानेच भेटता
त्यामुळे विकास कामांना गती मिळण्यासाठी संबंधीताची त्वरीत बदली करण्यात यावी. व विकास कामाची जाण असलेल्या सक्षम उप- अभियंताची येथे नियुक्ती करावी