Ticker

6/recent/ticker-posts

'डॉ. सुंकरवार याच्यावर गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यासाठी शिवसेनेचा १७ मे रोजी रास्ता रोको व किनवट बंद...!'"लिंगपिसाट डॉ. सुंकरवार याच्या विरोधात जनसामान्य एकवटले.


'डॉ. सुंकरवार याच्यावर गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यासाठी शिवसेनेचा १७ मे रोजी रास्ता रोको व किनवट बंद...!'



"लिंगपिसाट डॉ. सुंकरवार याच्या विरोधात जनसामान्य एकवटले..!!"



किनवट/माहूर
    चौदा वर्षाच्या अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगीक अत्याचार करून तिच्या गर्भपातासाठीही कारणीभुत ठरून जेलची हवा खात असलेल्या शरयू हॉस्पिटल मधील वैद्यकीय व्यवसाय करणारा वासनांध डॉ. सुंकरवार

 याच्यावर गर्भपात केल्याप्रकरणीही गुन्हे दाखल व्हावेत यासाठी दि. १७ मार्च रोजी शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको व 

किनवट बंद चे आयोजन करण्यात आले असून याबाबतचे निवेदन आज रोजी किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरन पुजार यांना देण्यात आले आहे.

आज दि.१२ मे रोजी शिवसेनेचे किनवट तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे यांच्या वतीने किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किर्ती किरन पुजार

 यांच्या कार्यालयात शिवसेना किनवट तालुक्याच्या  वतीने लेखी निवेदन देवून सदरच्या आंदोलनाविषयी सांगीतले आहे. यात नमूद केल्याप्रमाणे 

किनवट येथील शरयू रुग्णालयाचे डॉ. विकास सुंकरवार याने बालकामगार कामावर ठेवुन त्या अल्पवयीन कामगार मुलींचे सतत लैंगिक शोषण करुन तिच्या गर्भपातही केला. 

याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा दि. १७ मे २०२२ रोजी किनवट बंद व रस्ता रोको आंदोलन करण्यात
येत असल्याबाबतचा प्रशासनाला अल्टीमेटम दिला आहे.
     

याप्रकरणी त्याच्याविरुध्द अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल व्हावा.
तसेच तिला गर्भधारणा झाली हे समजल्यावर

 त्या मुलीस ही गोष्ट कुणासही सांगू नको अन्यथा तुला जिवे मारुण टाकतो अशी धमकी देऊन तिचा दि. ६ मे रोजी किनवट येथील डॉ. अमोल तोंडारे


यांचे सोनोग्राफी केंद्रात गर्भपात केला. असे लेखी स्वरूपात आरोप करून वासनांध डॉ. सुंकरवार 

याच्यावर तक्रार कर्त्याच्या तक्रारीवरुन इतर स्वरूपाचे गुन्हे नोंद झालेले असले तरीही गर्भपात
केल्याचा व बालकामगारास कामावर ठेवण्याचा अद्याप कोणताही गुन्हा नोंद झालेला नाही.

 त्यामुळे गर्भधारणेपासून ते गर्भपाता पर्यंत डॉ. विकास सुंकरवार याने त्या पिडीत अल्पवयीन मुलीवर कोणकोणते व कोणत्या डॉक्टरांकडे औषधोपचार केले व नेमके घटनेच्या दिवशी पिडीत मुलीवर कोण कोणत्या दवाखान्यात व कोणते उपचार


झाले याचा छडा लावुन संबंधीतावर गर्भपाताचा तात्काळ गुन्हा नोंदविण्यात यावा. 

अशी लेखी मागणी किनवट तालुका शिवसेनेच्या वतीने सहाय्यक जिल्हाधिका-यांकडे करण्यात आली आहे. 


अन्यथा शिवसेना पक्षाच्या वतीने दि. १७ मे रोजी रास्ता रोको व किनवट बंद करण्यात येईल असा अल्टीमेटम देण्यात आलावआहे. निवेदनावर किनवट तालुका शिवसेना प्रमुख बालाजी मुरकुटे

 यांच्यासह माजी नगराध्यक्ष सुनिल पाटील, दिशा समितीचे सदस्य मारोती सुंकलवार, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे 

किनवट तालुकाध्यक्ष सिताराम राचटकर, अतुल दर्शनवाड यांच्यासह अनेकांनी स्वाक्ष-या केल्या आहेत.