Ticker

6/recent/ticker-posts

किनवट/ता.प्रतिनिधी: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौक ते हबीब कॉलनी चौक पर्यंतच्या रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली असून यावरून चालणे कठीण झाले आहे


हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौक ते हबीब कॉलनी चौक पर्यंतच्या रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था;निर्ढावलेल्या प्रशासनास जाग केव्हा येणार?

किनवट/ता.प्रतिनिधी: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौक ते हबीब कॉलनी चौक पर्यंतच्या रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली असून यावरून चालणे कठीण झाले आहे

. यासंबंधी वेळोवेळी अर्ज विनंत्या करूनही सदरील रस्ता दुरुस्त न झाल्यामुळे नागरिकांचे बेहाल होत आहेत.


सदरील रस्त्यासाठी वेळोवेळी अर्ज विनंत्या करण्यात आल्या,अनेक वृत्तपत्रातून बातम्या प्रसिद्ध झाल्या. परंतु सदरील रस्ता अजूनही दुरुस्त झाला नाही किंवा त्यावर डागडुजी करण्यात आलेली नाही.
  

 सदरील रस्ता किनवट -गोकुंदा- बळीराम पाटील कॉलेज,उपजिल्हा रुग्णालय,गोकुंदा व कोचिंग क्लासेस कडे जाण्याकरिता जवळचा आहे. 

त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. लहान मुले, वृद्ध नागरिक यांना चालणे कठीण झाले आहे. वाहन चालविणाऱ्यांना तर तारेवरची कसरत करावी लागत आहे.

 या रस्त्यावर केव्हा अपघात होईल याचा नेम नाही.


    सदरील रस्त्यावर एक प्रसिद्ध एकवीरा देवीचे मंदिर आहे तसेच अनेक कोचिंग क्लासेस आहेत बाजूलाच पवित्र बौद्ध स्तूप आहे. त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थी-विद्यार्थिनींची व नागरिकांची वर्दळ दिसून येते.


परंतु एकवीरा देवीच्या समोर तसेच भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे यांच्या घरासमोर मोठा खड्डा तयार झालेला असल्यामुळे सर्व नाल्याचे  दुर्गंधीयुक्त पाणी या खड्ड्यात जमा होते. 

या खड्ड्यात पडून अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींचे अंगावरील कपडे खराब झालेले आहेत तसेच त्यांना किरकोळ मार लागून जखमी सुद्धा झाले आहेत.
 
  परंतु निर्ढावलेल्या प्रशासनास गेल्या दोन वर्षापासून जाग आलेली नाही. सदरील रस्ता त्वरित न झाल्यास काँग्रेसचे पदाधिकारी आनंद भालेराव  नागरिकांना घेऊन आंदोलन करणार आसल्याचे समजते.


तसेच गोकुंदा ची शान असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौक या ठिकाणी नालीमध्ये पाणी साचल्यामुळे व नाल्यांची साफसफाई न झाल्यामुळे पावसाचे पाणी तुंबून चौकात दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे येथील व्यापारीही नाकाला रूमाल बांधून आपला व्यवसाय करीत आहेत.


सदरील रस्ता हा कोणाच्या स्वामित्वात येत आहे हे कळायला मार्ग नाही व कोणतेही प्रशासन सदरील रस्त्याकडे पाहायलाही तयार नाही.