Ticker

6/recent/ticker-posts

आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटी लि. च्या 'सहकारसूर्य' मुख्यालयाचा उदघाटन सोहळा आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हस्ते संपन्न झाला


आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटी लि. च्या 'सहकारसूर्य' मुख्यालयाचा उदघाटन सोहळा आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हस्ते संपन्न झाला. 

या सोहळ्याला केंद्रीय मंत्री मा. ना. श्री. नितीनजी गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संबोधित केले, तसेच राज्याचे सामाजिक न्याय मंत्री मा.ना.धनंजयजी मुंडे, 

पर्यावरण राज्यमंत्री मा.ना.संजयजी बनसोडे यांच्यासह विविध मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली. त्याचबरोबर गुरुवर्य सूर्यकांत देसाई व बाबा बलविंदरसिंह जी यांनी देखील उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली. 

8 मे 2013 रोजी सुरू झालेल्या गोदावरी अर्बन या पतसंस्थेने अत्यंत कमी कालावधीत महाराष्ट्राबरोबरच तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात या शेजारील राज्यात देखील पतसंस्थेच्या शाखा सुरू केल्या आहेत. 

दशकपूर्तीकडे वाटचाल करणाऱ्या गोदावरी अर्बनचे अत्याधुनिक तंत्रज्ञान व सर्व सोयींनी सुसज्ज असे 'सहकारसूर्य' मुख्यालय सर्वसामान्यांच्या सेवेसाठी आजपासून सज्ज झाले आहे...!

या कार्यक्रमास माजी मंत्री कमलकिशोर कदम, माजी मंत्री सुर्यकांताताई पाटील, माजी मंत्री अर्जुनभाऊ खोतकर, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार संतोषराव बांगर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहनराव हंबर्डे , 

आ. भीमराव केराम,  आमदार सतीश चव्हाण, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार राजेश पवार, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, 
माजी मंत्री माधवराव किन्हाळकर, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आ. अनुसया ताई खेडकर , माजी आ. प्रदीप नाईक , माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे, 

माजी आमदार अनिल कदम, माजी आमदार रोहिदास चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर, दत्ता पाटील कोकाटे, उमेश मुंडे, ऍड. शिवाजी पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष दिलीप चव्हाण, 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को - ऑप सोसायटीचे अध्यक्ष सुरेश वाबळे, भारतीय बँक कर्मचारी संघटनेचे सचिव देविदास तुळजापूरकर, 

यांच्यासह गोदावरी अर्बनच्या पाचही राज्यातील शाखांचे शाखा व्यवस्थापक , अधिकारी कर्मचारी सह हिंगोली, नांदेड, परभणी आणि यवतमाळ जिल्ह्यातील गोदावरी अर्बनचे ग्राहक , ठेवीदार , सभासद , शिवसेना पदाधिकारी , शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

#GodawariUrban Sharad Pawar Nitin Gadkari