डॉक्टर असोसिएशन किनवट तर्फे महाराष्ट्र डॉक्टर्स नोंदणी प्राधिकरणाला अत्याचारी घटनेची अद्यापपर्यंत माहिती कळवण्यात आली नाही
किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट शहरात घडलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली त्यासंदर्भात किनवट पोलीस स्टेशन येथे गुन्हाही दाखल झाला सदर घटनेची वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये वृत्त सादर करण्यात आले
परंतु डॉक्टर असोसिएशन तर्फे या घटनेत बद्दल काहीही बोलण्यात आले नव्हते या बाबीची दखल घेऊन डॉक्टर असोसिएशन किनवट ने आज दिनांक 13/5/2022 रोजी साने गुरुजी रुग्णालय येथे पत्रकार परिषद घेतली सदर परिषदेमध्ये अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.
डॉक्टर असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. पत्की यांनी सदर पत्रकार परिषदेमध्ये या आमानवी घटनेच्या संदर्भात मध्ये ज्या ज्या डॉक्टरांनी त्या पीडित मुलीवर डॉक्टर म्हणून उपचार केला त्या डॉक्टरांकडे आरोपी म्हणून पाहण्यात येऊ नये म्हणून सांगण्यात आले तसेच त्या मुलीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी डॉक्टर या नात्याने उपचार केला
व त्या मुलीचा जीव वाचवला म्हणून त्या कोणत्याही डॉक्टरांना आरोपी या नजरेतून पाहण्यात येऊ नये किंबहुना त्यांच्यावर कोणते प्रकारचे आरोप करण्यात येऊ नये असे सांगण्यात आले जर असे झाले तर भविष्यात कोणताही डॉक्टर उपचार करण्यास धजावेल का ?असा
प्रश्न विचारण्यात आला म्हणून किनवट मध्ये मेडिकल प्रॅक्टिस साठी चांगली परिस्थिती निर्माण करणे ही आपली जबाबदारी आहे. असे सांगण्यात आले याप्रसंगी किनवट येथील पत्रकार नसीर तगाले यांनी यापुढे डॉक्टरस असोसिएशन किनवट काय करणार आहे ?
असा प्रश्न विचारला असता डॉक्टर असोसिएशन किनवट हे या अमानवीय घटनेचा निषेध करते असे सांगण्यात आले व कोणत्याही गुन्हेगाराला संघटना पाठीशी घालणार नाही असे सुद्धा सांगण्यात आले प्रसंगी आमचे तालुका प्रतिनिधी
यांनी याच प्रश्नाला अनुषंगिक असा प्रश्न विचारला तो म्हणजे महाराष्ट्र डॉक्टर नोंदणी प्राधिकरणाला तुमच्या संघटनेमार्फत ही अमानवी अत्याचाराची घटना कळविण्यात आली का ?असा प्रश्न विचारला असता या घटनेची माहिती अद्यापपर्यंत आमच्या संघटनेमार्फत फक्त प्रशासनाला ही माहिती कळविण्यात आली आहे
परंतु महाराष्ट्र डॉक्टर्स नोंदणी प्राधिकरणाला ही माहिती आम्ही कळवली नाही आमच्या वरिष्ठाला याबद्दल विचारून माहिती घेऊन ही माहिती आम्ही निश्चितच कळवेन असे आश्वासन देण्यात आले.
अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराला कुणीही पाठीशी घालू शकत नाही हे जरी सत्य असले तरी महाराष्ट्र डॉक्टर्स नोंदणी प्राधिकरणाला अद्यापपर्यंत कोणत्याही सुजाण नागरिकाकडून अथवा कोणते संघटनेकडून अथवा डॉक्टर असोसिएशन कडून अद्याप पर्यंत ही माहिती गेलेली नाही ही दुर्दैवाची बाब आहे
हे असे होत नाही म्हणूनच भविष्यात अशा अमानवी घटना घडत असतात. हे आपणास या ठिकाणी विचारात घ्यावेच लागेल पीडित मुलीला न्याय मिळेलच यात तिळमात्र शंका नाही .