Ticker

6/recent/ticker-posts

किनवट प्रतिनिधी किनवट सारख्या मागास दुर्गम भागातील महिलांच्या प्रश्नासाठी लढा देणाऱ्या येथील अल्पसंख्यांक समाजातील सामाजिक कार्यकर्त्या शेख परवीन यांच्या कार्याची दखल घेऊन काँग्रेस पक्षाने त्यांना राज्यस्तरावर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली असून महिला काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष मिस नीता डिसूजा


किनवट प्रतिनिधी किनवट सारख्या मागास दुर्गम भागातील महिलांच्या प्रश्नासाठी लढा देणाऱ्या येथील अल्पसंख्यांक समाजातील सामाजिक कार्यकर्त्या शेख परवीन यांच्या कार्याची दखल घेऊन काँग्रेस पक्षाने त्यांना राज्यस्तरावर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली असून महिला काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष मिस नीता डिसूजा

 यांच्या मान्यतेने जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीत शेख परवीन यांची महाराष्ट्र महिला काँग्रेस प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे या निवडीबद्दल नांदेड जिल्ह्यातीलकाँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे
 
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने महिला काँग्रेस कमिटीच्या राज्य कार्यकारणीत फेरबदल केले असून तळागाळातील निष्ठावान महिलांना राज्य स्तरावर काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे

 महिलांच्या माध्यमातून ग्रामीण भागात पक्षाला बळकटी देण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आदेशानुसार महिला काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष नीता डिसूजा 

यांनी महाराष्ट्र महिला काँग्रेस कमिटीच्या नवीन कार्यकारिणीला नुकतीच मान्यता दिली असून त्या अनुषंगाने जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र प्रभारी ममता भूपेश यांनी 28 मे रोजी काँग्रेस महिला कार्यकारिणी घोषित केली  

यात किनवट येथील काँग्रेसच्या ज्येष्ठ  कार्यकर्त्या शेख परवीन यांची प्रदेश सचिवपदी नियुक्ती केली आहे शेख परवीन यांनी किनवट तालुक्यासह नांदेड जिल्ह्यात पक्षासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन  काँग्रेस ओबीसी विभागाचे राज्य समन्वयक प्रमील नाईक 

यांनी त्यांच्या नावाची शिफारस पक्षश्रेष्ठींकडे केली होती या नियुक्तीबद्दल नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून शेख परवीन यांचे अभिनंदन होत आहे


 किनवट सारख्या ग्रामीण आदिवासी तालुक्यात माझ्यासारख्या सामान्य अल्पसंख्याक समाजातील महिलेला पक्षाचे सचिवपद मिळणे खरोखरच खूप मोठी गोष्ट आहे काँग्रेसचे  नेते प्रमील नाईक

 यांच्या प्रयत्नामुळे मला एवढ्या मोठ्या पदावर काम करण्याची संधी प्राप्त झाली राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण,

 प्रदेशाध्यक्ष नाना पटोले प्रमिल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात संपूर्ण राज्यभरात महिलांची संघटनात्मक बांधणी करून दिलेली जबाबदारी सार्थ ठरवेन अशा प्रतिक्रिया शेख परवीन यांनी नियुक्तीनंतर दिल्या आहेत