पिस्टल बाळगल्याप्रकरणी दोघे जण सिंदखेड पोलीसांच्या ताब्यात...
'लाखांवर मुद्देलाल सिंदखेड पोलीसांकडून जप्त'
"माहूरचे दोघे सिंदखेड पोलीसांच्या ताब्यात"
माहूर, प्रतिनिधी
गुप्त बातमीदाराने दिलेल्या खबरीवरून माहूर ते किनवट रोडवर एका गाडीत पिस्टल असल्याच्या खात्रीलायक माहितीवरून माहूर तालुक्यातील अंजनखेड पुलाजवळ
सिंदखेड पोलीसांनी सापळा रचून केलेल्या कारवाईत माहूरच्या दोन जणांसह पिस्टल व वाहनाला ताब्यात घेवून गुन्हा दाखल केला आहे.
काल दि. ७ मे रोजी सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक भालचंद्र तिडके यांच्यासह पो.हे.काँ. पठाण, पो.कॉ. संघरत्न सोनसळे, पो.कॉ. गजानन नंदगावे हे खाजगी वाहनाने पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की,
एक स्विफ्ट डिझायर कार पांढ-या रंगाची जिचा नंबर MH 20CS 0370 मध्ये दोन इसम असुन ते सारखणी कडुन माहुर कडे जात आहेत.
सदर वाहनात पिस्टल आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने पेट्रोलिंग करीत असलेले पोलीस पथक सायंकाळी साडेपाच च्या सुमारास मौजे अंजनखेड येथील
पुलाजवळ नमुद वाहनास
थांबवुन त्यांची पाहणी केली असता वाहनात दोन इसम बसलेले दिसुन आले.
त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नांव गाव विचारले असता त्यांनी आपले नांव सांगून माहूरचे असल्याचे सांगितले.. त्यावेळी कारची पाहणी केली
असता कार मध्ये 1160.00 एक नकली पिस्टल लोखंडाची ज्यावर इंग्रजीमध्ये 'मेड इन चायना'
असे असलेली ब्लॅक स्टील कलरची त्याचे मुठीवर काळ्या रंगाची ग्रिप असलेली जुनी वापरत असलेली पिस्टल आढळून आली..
यावरून पो.हे.कॉ. हकीम सुलेमान पठान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गु र नं 61/2022 कलम 6/25 भारतीय हत्यार कायदा प्रमाणे सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
असून पोलीसांनी पांढ-या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारसह एक लाख एक हजार एकशे साठ (101160/-₹) रूपयाचा मुद्देमाल जप्त केेेला आहे.