रखरखत्या उन्हात आमदार भीमराव केराम व सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी केला "लोकसहभागातून तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ "
किनवट : रखरखत्या उन्हात भर दुपारी बारा वाजता एकेक किलोमीटर पायी चालत जाऊन आमदार भीमराव केराम व सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी केला "लोकसहभागातून तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ "
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मिशन 75 उपक्रम' राबविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा उप विभाग
किनवट यांच्यावतीने कोठारी (चि) व शनिवारपेठ सिंचन तलावातील गाळ लोकसहभागातून काढण्याच्या कामाचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित केला होता.
गंभीर आजारातून आपण नुकतेच सावरलो आहोत याची चिंता न करता आमदार भीमराव केराम रखरखत्या उन्हात सुमारे एक किमी पायपीट करत कामाच्या शुभारंभासाठी तलाव स्थळी पोहचले. यावेळी त्यांचे समवेत सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार,
तहसिलदार तथा मुख्याधिकारी डॉ. मृणाल जाधव, पंचायत समितीचे प्रशासक तथा गट विकास अधिकारी सुभाष धनवे, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार ,
मावळत्या पं.स . सभागृहाचे सभापती प्रतिनिधी दत्ता आडे , गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने , बाल विकास प्रकल्पाधिकारी अश्विनी ठकरोड , आयोजक उप अभियंता किशोर संद्री , मानव विकास समन्वयक उत्तम कानिंदे व लोकसहभाग देणारे शेतकरी उपस्थित होते.
उन्हातान्हाची पर्वा न करता आमदार व प्रशासकीय अधिकारी पायपीट करत तर कधी दुचाकीने तलावाजवळ जाऊन गाळ काढण्याच्या कामाला प्राधान्यक्रम देत आहेत.