Ticker

6/recent/ticker-posts

कुषी उत्पन्न बाजार समितीतील भ्रष्टाचार तक्रार करुनही सुरूच - संचालक व्यंकटराव नेम्मानीवार किनवट (ता.प्र.) तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील भ्रष्टाचार व गैरव्यवहाराबाबत सातत्याने तक्रारी करुनही बाजार समितीत भ्रष्टाचार सुरुच आहे


कुषी उत्पन्न बाजार समितीतील भ्रष्टाचार तक्रार करुनही सुरूच - संचालक व्यंकटराव नेम्मानीवार     

 किनवट  (ता.प्र.) तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील भ्रष्टाचार व गैरव्यवहाराबाबत सातत्याने तक्रारी करुनही बाजार समितीत भ्रष्टाचार सुरुच आहे. 

याप्रकाराची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी संचालक तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष व्यंकटराव नेम्मानीवार यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे.                    

 या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींकडून बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार करण्यात आला आहे.

 याबाबत आपण सतत ४ वेळा कागदपत्रांसह तक्रारी केल्या होत्या. तक्रारींची दखल घेत सहायक निबंधक यांनी चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती गठीत केली.

 चौकशी समिती गैरव्यवहाराची चौकशी करण्यापूर्वीच चौकशीवर स्थगिती मिळवत संबंधितांनी भ्रष्टाचारावर पांघरूण घातले आहे. बाजार समितीत सेवारत जुन्या कर्मचाऱ्यांचे वेतन २० महिन्यांपासून थकले 

असताना ४५ लाखांच्या आर्थिक उलाढालीतून नवीन ३ कर्मचाऱ्यांची नियमबाह्य नेमणूक करण्यात आली. नेमणूक केलेल्या ३ कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी बाजार समितीच्या अधिपत्याखाली असलेल्या चिखली 

येथील जिनिंग प्रेसिंगमधून ११ लाख ८० हजार रुपये उचलले. कागदोपत्री पगार केल्याचे दाखवून प्रत्यक्षात त्या कर्मचाऱ्यांचा पगार न करता वरील रक्कम सभापती व संचालकांनी आपसात वाटून घेतली. 

कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केलेली पेन्शन, अंशदान अनुदानाची रक्कम शंकरराव चव्हाण नागरी बँकेत भरणा न करता सदर रक्कम इतरत्र खर्च करण्यात आली. सभापतींनी दि.२१ एप्रिल रोजी बाजार समितीची सभा कागदोपत्री दाखविली आहे.

 सदर सभा बोगस असून, सभेची नोटीस अथवा अजेंडा आपल्यासह संचालक आत्माराम मुंडे, टी.एम.केंद्रे यांच्यासह उपनिबंधक यांच्यापर्यंतही पोहोचली नाही. 

भ्रष्टाचाराची व गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करा, मुदत संपलेल्या बाजार समितीची निवडणूक घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्या, 

अशी मागणी व्यंकटराव नेम्मानीवार यांनी केली आहे.