Ticker

6/recent/ticker-posts

किनवट,ता.२८ : वहातुक ठेकेदारकडे असलेल्या हमाल कमतरतेमुळे किनवट गोदामाअंतर्ग असलेल्या रास्त भाव दुकानदारांना दोन दिवस उशिरा धान्य मिळणार आहे


हमालांच्या कमतरतेमुळे धान्य पुरवठा विस्कळीत ;शिधापत्रिका धारकांची होतेय गैरसोय

किनवट,ता.२८ : वहातुक ठेकेदारकडे असलेल्या हमाल कमतरतेमुळे किनवट गोदामाअंतर्ग असलेल्या रास्त भाव दुकानदारांना दोन दिवस उशिरा धान्य मिळणार आहे.

यामुळे गोरगरिब असलेल्या शिधापत्रिका धारकांनाही दोन ते तिन दिवस उशीरा धान्य मिळणार असल्याने शिधापत्रिका धारकांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
   

 वारंवार होणारा हा प्रकार टाळण्यासाठी तहसीलच्या पुरवठा विभागाने  याकडे लक्ष देऊन हा प्रकार कायमचा निकाली काढावा,अशी मागणी रास्त भाव दुकानदार संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष मिलिंद सर्पे यांनी केली आहे. 

अगोदरच पुरवठा विभाग अन्नधान्याच्या अनियमित पुरवठ्यामुळे दोन महीने मागे चालत आहे.एप्रिल महीन्याचे धान्य आत्ता मे च्या शेवटच्या आठवड्यात गोदामात उपलब्ध झाले आहे. 

यातच वहातूक ठेकेदारकडे हमालांची कमतरता आहे.यामुळे आज(ता.२८)व सुट्टी असल्याने उद्या(ता.२९) गोदामातून धान्य पुरवठा होणार नाही.धान्य न मिळाल्याने गोरगरिबांच्या चुली पेटण्यात दिरंगाई होणार आहे. 

हमालांचा प्रश्न वहातूक ठेकेदाराने पर्यायी व्यवस्था करुन त्वरीत सोडवावा,अशी मागणीही सर्पे यांनी केली आहे.