नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडसाठी पाठवले जाणारे विस्फोटक पदार्थ आणि अनेक हत्यारे हरियानातील करनाल पोलीसांनी पकडून नांदेडवर येणारे अरिष्ठ थांबवले आहे.
करनालचे पोलीस अधिक्षक गंगाराम पुनिया यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार एक संशयीत चार चाकी गाडीमध्ये विस्फोटक असल्याची माहिती त्यांना प्राप्त झाली.
करनालचे पोलीस अधिक्षक गंगाराम पुनिया यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार एक संशयीत चार चाकी गाडीमध्ये विस्फोटक असल्याची माहिती त्यांना प्राप्त झाली.
पोलीसांकडे असलेल्या रोबोटच्या माध्यमातून या गाडीची तपासणी झाली तेंव्हा त्यात विस्फोटक असल्याचे पोलीसांना कळले.
याबाबत हरियाना पोलीसंानी विस्फोटक, इतर हत्यारे, बंदुका आणि काही जिवंत गोळ्या असे साहित्य जप्त केले आहे. पकडण्यात आलेले दहशतवादी गुरप्रित, अमनदिप, परमिंदर आणि भुमिंदर असे असल्याचे गंगाराम पुनिया यांनी सांगितले.
करनाल येथील राहणारा हरविंदरसिंघ उर्फ रिंदा संधू हा आता बब्बर खालसा या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. तो सध्या पाकिस्तानमध्ये आणि त्याने ड्रोनच्या माध्यमाने हे साहित्य फिरोजपुर
येथे पाठविले आणि मग हे चार दहशतवादी ते साहित्य घेवून नांदेडला येणार होते आणि येथे कांही तरी खलबत रचणार होते अशी माहिती करनाल पोलीसांनी दिली आहे.
हरविंदरसिंघ उर्फ रिंदा संधू हा सध्या पाकिस्तानच्या आयएएसच्या संरक्षणात पाकिस्तानमध्ये राहत आहे.
पुर्वी तो कांही दिवस नेपाळमध्ये होता. तेथून तो पाकिस्तानला गेला आणि तेथूनच आतंकवादी मॉड्युल तो चालवतो असे गंगाराम पुनिया यांनी सांगितले.
नांदेड पोलीस आणि नांदेड जिल्ह्यातील जनतेने आता पुर्णपणे दक्ष राहण्याची गरज आहे.
नांदेड जिल्ह्यात मागील एका महिन्यापासून पोलीस गुन्हेगारांवर वरचढ ठरण्यासाठी धावपळ करत आहेत.
आजच नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने एका गुन्हेगारावर गोळीबार करून तो जखमी झाल्यानंतर त्याला ताब्यात घेतले आहे.
जनतेने सुध्दा आपण इकडे-तिकडे वावरत असतांना आपली नजर बारकाईने आणि चाणक्षपणे वापरण्याची गरज आहे. ज्यामुळे आपल्यासोबत कांही धोका होणार नाही.
ज्या पध्दतीने हरियाणा पोलीसांच्या गुप्तहेरांनी अर्थात त्यांच्या व्हिसल ब्लोअरने चार चाकी वाहनांमध्ये विस्फोटक असल्याची माहिती पोलीसांपर्यंत पोहचविली आणि पोलीसांनी त्यांना गजाआड केले.
नाही तर नांदेड जिल्ह्यातील व्हिसल ब्लोअर मिच कसा खरा आणि त्यासाठी मला पोलीस सुरक्षा हवी हे सांगण्यातच परेशान आहेत आणि नांदेड पोलीस या व्हिसल ब्लोअरच्या अर्जांमुळे आपल्याला त्रास होईल