Ticker

6/recent/ticker-posts

किनवट प्रतिनिधी मुस्लिमद्वेष भावनेने ग्राहक सेवा आयडी बंद करून पोलिसात खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणाऱ्या तसेच नव्याने आय डी सुरू करण्यासाठी पाच लाख रुपयांची खंडणी मागून आर्थिक व मानसिक छळ करणाऱ्या किनवट येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखाधिकार्यावर गुन्हे दाखल करून निलंबित करावे


किनवट प्रतिनिधी मुस्लिमद्वेष भावनेने ग्राहक सेवा आयडी बंद करून पोलिसात खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणाऱ्या तसेच नव्याने आय डी सुरू करण्यासाठी पाच लाख रुपयांची खंडणी मागून आर्थिक व मानसिक छळ करणाऱ्या किनवट येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखाधिकार्यावर गुन्हे दाखल करून निलंबित करावे 

अशी लेखी तक्रार सय्यद अजगर सय्यद अकबर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा  दिला आहे

तक्रारीत नमूद केले आहे की येथील तहसील कार्यालयासमोर सय्यद अजगर हे मागील4 वर्षांपासून  महाराष्ट्र ग्रामीण बँकेसी संलग्न असलेले 

ग्राहक सेवा केंद्र बँकेच्या नियमानुसार  चालवत असताना  शाखाधिकारी रुपेश दलाल यांनी दि 3/11/ 2021 रोजी त्यांच्या नावे असलेली ग्राहक सेवा आयडी बंद केली 

या ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून ते बँकेला मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा करून देत असतानाही जाणीवपूर्वक बँकेचे मॅनेजर  दलाल यांनी पूर्वसूचना न देता ग्राहक सेवा आयडी बंद केली

 या प्रकरणी 6 डिसेंबर 2021 रोजी  सय्यद अजगर यांनी बँकेच्या मॅनेजिंग डायरेक्टरकडे रीतसर तक्रार केली त्यानंतर बँकेत जाऊन अनेकदा आय डी सुरू करण्याची विनंती केली

 परंतु त्यांनी  तू मुस्लिम आहेस तुमचे लोक आतंकवादी असल्यामुळे मी तुझी आयडी बंद केली अशा शब्दात  अपमानित केल्याचे सय्यद अजगर यांचे म्हणणे आहे.

बँकेत कामानिमित्त गेल्यावर तु माझ्या विरोधात बँकेच्या वरिष्ठाकडे व पोलिसाकडे तक्रार का दिली?

 तक्रार करशील तर तुझ्यावर पोलिसात खोटा गुन्हा दाखल करतो आणि तुला गुंडामार्फत खतम करतो अशी धमकी दिली


 त्यांच्या या धमकीला घाबरुन किनवट पोलीस ठाण्यातही तक्रार दिली मात्र त्यावर कारवाई झाली नाही. शाखाधिकारी दलाल यांनी जाणीवपूर्वक मुस्लिमद्वेषातून 

माझी ग्राहक सेवा आय डी बंद केली असून पुन्हा सुरू करण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करत बँकेतून हाकलून दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे 

येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या परिसरात अनेक ग्राहक सेवा केंद्र बेकायदेशीरपणे सुरू असून त्यांना शाखाधिकारी  हे अर्थपूर्ण हितसंबंधातून पाठीशी घालत आहेत.

माझा व्यवहार पारदर्शक असल्यामुळे मी शाखा अधिकाऱ्यांना इतरांप्रमाणे पैसे देत नसल्यामुळे सूडबुद्धीने त्यांनी माझी आयडी बंद करून अन्याय केला

 याविरोधात बँक,व पोलीसा कडे विनंती अर्ज करूनही  न्याय मिळाला नाही. 

मी गरीब कुटुंबातील सुशिक्षित बेरोजगार असून ग्राहक सेवा केंद्र बंद झाल्यामुळे उपासमारीची वेळ येत आहे.

त्यामुळे  शाखाधिकारी रुपेश दलाल यांच्या गैरकारभाराची  व जातीय द्वेषभावनेतून ग्राहक सेवा आय डी बंद करून परत सुरू करण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करत जीवे मारण्याची धमकी  दिल्याप्रकरणी 

त्यांच्यावर  निलंबनाची कारवाई करावी अन्यथा बेमुदत आमरण उपोषण करण्याचा ईशारा सय्यद अजगर यांनी तक्रारी अर्जातून दिला आहे