Ticker

6/recent/ticker-posts

या क्रीडा महोत्सव स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी क्रीडा ज्योत घेण्याचा मान सोळा तालुक्यापैकी किनवट तालुक्याला मिळाल्याने निश्चितच ही बाब किनवट माहूर साठी अभिमानाची आहे


महसूल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन ना. थोरात यांच्या हस्ते तर क्रीडा ज्योत घेण्याचा मान राठोड यांना.

किनवट l प्रतिनिधी.
गुरुगोविंद सिंग स्टेडियम नांदेड येथे महसूल क्रीडा स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले.

 राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते 

या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले तर क्रीडा ज्योत घेण्याचा मान किनवट तालुक्यातील महसूल कर्मचारी राजू राठोड मांडवी 

यांना या क्रीडा महोत्सव प्रसंगी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी बिपिन ईटणकर, सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार,

 जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सहा महसूल कर्मचारी उपस्थित होते.


या क्रीडा महोत्सव स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी क्रीडा ज्योत घेण्याचा मान सोळा तालुक्यापैकी किनवट तालुक्याला मिळाल्याने निश्चितच ही बाब किनवट माहूर साठी अभिमानाची आहे. 

आणि राजू राठोड महसूल कर्मचारी यांनी ती समर्थपणे जबाबदारी सांभाळली. 

गेल्या आठ दिवसापासून चालू असलेल्या क्रीडा महोत्सव स्पर्धेत सर्व महसूल कर्मचारी सहभाग नोंदवून एक वेगळा आनंद घेत  आहे. 

विविध क्रीडा स्पर्धा, व्यायाम, योगा, हे उत्तम आरोग्यासाठी अतिशय महत्वाची बाब आहे. किंबहुना आपल्या दैनंदिन जीवनातील

 एक अविभाज्य घटक आहे. गेल्या आठ दिवसापासून विविध क्रीडा स्पर्धा प्रकाराचा सराव करीत आनंद 

सर्व महसूल कर्मचारी यांनी मनसोक्त लुटला 7 रोजी या क्रीडा स्पर्धेचे निरोप समारंभ असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.