Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्य पोलीस जिंदाबादमोठी बातमी! नांदेडला हादरवणाऱ्या संजय बियाणी हत्याकांडात सहा आरोपी अटकेत.*नांदेड- बिल्डर संजय बियाणी हत्याकांडात सहा आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली माहिती


महाराष्ट्र राज्य पोलीस जिंदाबाद
मोठी बातमी! नांदेडला हादरवणाऱ्या संजय बियाणी हत्याकांडात सहा आरोपी अटकेत.
*नांदेड- बिल्डर संजय बियाणी हत्याकांडात सहा आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली माहिती*.


नांदेडमधील प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांची ५ एप्रिल रोजी राहत्या घरासमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. नांदेडला हादरवणाऱ्या या हत्याकांडाच्या तपासाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. या पथकाने 55 दिवस सातत्याने सहा राज्यात जाऊन केला तपास. यात वीस अधिकारी आणि 60 कर्मचाऱ्यांचा समावेश होता.  

विशेष म्हणजे, या प्रकरणी चार देशात पत्रव्यवहार करण्यात आला.त्यानंतर  तपासातून सहा आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले*.  
*जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्वत: नांदेड शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली होती. 

राज्याचे गृहमंत्री दिलीप* *वळसे-पाटील यांची भेट घेऊन चव्हाण यांनी त्यांना माहिती दिली होती तर भाजपचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी थेट दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन सीबीआय चौकशीची मागणी केली होती. 

मात्र, मंत्री* *वळसे-पाटील व मंत्री चव्हाण यांनी राज्य* *पोलिसांवरच विश्वास दाखविला. त्यानंतर या* *प्रकरणाच्या तपासासाठी अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले.

 परिक्षेत्रातील* *‘डिटेक्शनमध्ये एक्सपर्ट’ पोलीस अधिकाऱ्यांचा यात समावेश करण्यात आला.दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी १४ मे रोजी येथे संजय बियाणी यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले हाेते तसेच लवकरच मारेकरी पकडले जातील, असा विश्वास कुटुंबीयांना दिला होता*. 

*संजय बियाणी यांच्या खुनाच्या निमित्ताने विविध कारणे व अनेक पैलू पुढे आले. त्या प्रत्येक पैलूवर पोलिसांनी फोकस निर्माण केला. गेली दोन महिने बियाणी कुटुंबीय, राजकीय मंडळी व नागरिकांच्या टीकेचा सामना करत पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास केला. यानिमित्ताने पोलीस पथके परप्रांतातही जाऊन आली. 

संशयावरून अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी केली गेली. तब्बल दोन महिने सखोल तपास केल्यानंतर या खुनाचा छडा लागला आहे*.
*महाराष्ट्र राज्य पोलीस जिंदाबाद!*