Ticker

6/recent/ticker-posts

सिंदगी मोहपुरचे मंडळ अधीकारी एल.जी कानगुले यांनी अवैधरेती तस्‍करी करनारे टिप्‍पर केले जप्‍त


 दि.१०/ जुन २०२२ रोजी सकाळी माहुर तालुक्‍यातुन किनवट तालुक्‍यात अवैध रेती तस्‍करी करणारे MH 29 BE 5010  क्रमांकाचे टिप्‍पर, किनवट कडे जात असतांना सिंदगी मोहपुरचे मंडळ अधीकारी एल.जी.कानगुले व तलाठी एन.एस.माळोदे


 यांनी मोठ्या शिताफीने तिन ब्रासचे टिप्‍पर जप्‍त केले असुन संबधीत वाहनाचे अहवाल वरिष्‍ठांना देण्‍यात आले असुन वरिष्‍ठ काय आदेश देतात या कडे  लक्ष लागुन आहे.

     

या बाबत सविस्‍तर वृत्‍त असे कि माहुर तालुक्‍यातील पडसा येथील खुख्‍यात रेती तस्‍कर ईम्रान शेख नवाब याच्‍या भावाच्‍या नावावर असलेल्‍या वरिल वाहनात दर रोज दिवस राञ महसुल व पोलीस प्रशासनाच्‍या डोळ्यात धुळफेक करुण


  एकाच रायल्‍टीवर अनेक वेळा रेती तस्‍करी करत असतो तर मॅजीक पेनचा सर्रास वापर करत असतो,माञ चोर कितीही हुशार असला तरी एक न एक दिवस पकडला जातो या म्‍हनी प्रमाने ईम्रान शेख नवाब


 याच्‍या भावाच्‍या नावावर असलेल्‍या MH 29 BE 5010  क्रमांकाचे टिप्‍पर दि.१० जुन २०२२ रोजी सकाळी सारखनी मार्गे किनवट कडे जात असतांना राजगड वरुन 


या वाहनाचा सिंदगी मोहपुरचे मंडळ अधीकारी एल.जी.कानगुले व तलाठी एन.एस.माळोदे यांनी पाठलाग करत थेट किनवट जवळ या वाहनाची रायल्‍टीची तपासनी केली असता


 या वाहनाची रायल्‍टी दि.०९ जुन २०२२ रोजी मध्‍य राञी समाप्‍त झाल्‍याचे निर्दशनास आले,वाहन चालकाला अधीक विचारपुस केली असता त्‍याने उडवा उडवीची उत्‍तरे दिल्‍याने सदर वाहनास 


किनवट येथील सहाय्यक जिल्‍हाधीकारी यांच्‍या कार्यालयात जप्‍त करुन ठेवण्‍यात आले आहे.  


 मंडळ अधीकारी एल.जी.कानगुले व तलाठी एन.एस.माळोदे यांनी    सदर वाहनाचा पंचनामा करुन वरिष्‍ठ अधीकार्या कडे दाखल केला आहे. वरिष्‍ठ अधीकारी पुढील दंडात्‍मक कार्यवाही व चोरीचा गुन्‍हा दाखल करण्‍याचे आदेश देतात कि काय या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.