वाई बाजार येथील कै. पार्वतीबाई विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम....
"शाळेचा निकाल 97.77 % ; गुणवंतांवर अभिनंदनाचा वर्षाव"
वाई बाजार येथील कै. पार्वतीबाई विद्यालयाने निकालाची परंपरा कायम राखत याही वर्षी घवघवीत यश संपादन केले असून उल्लेखनीय यश संपादित केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसह शाळेच्या कर्मचारी व प्रशासनाचेही कौतुक केल्या जात आहे..
गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष वाया गेल्यानंतर मार्च-एप्रील २०२२ या वर्षात प्रथमच घेण्यात आली. यामध्ये उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच दिनांक ८ जून रोजी जाहीर झाला.
यात माहूर तालुक्यातील वाई बाजार येथील कै.पार्वतीबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल 97.77% एवढा लागला असून
त्यात एकूण 45 विद्यार्थ्यापैकी तब्बल 44 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
प्राप्त केलेल्या यशात कु. नंदिनी संतोष पवार हिने 84.67% घेऊन प्रथम, कु. आरती संतोष राठोड 82.67% घेवून द्वितीय, कु. साक्षी संजय हिवाळे हिने 82.17% तृतीय,
कु. क्रांती किशोर पवार 81.83 % एवढे गुण घेऊन चौथा तर कु. नामिका रामकृष्ण आरके हीने 81.83% एवढे समान गुण घेऊन पाचवा क्रमांक पटकावला आहे.
वरील सर्व विद्यार्थ्यांचे सर्व कर्मचारी वृंद व शाळेचे प्राचार्य व्ही. आर. राठोड यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष सतीश पाटील भुरेवार तसेच संस्थेचे सचिव सागर भुरेवार
यांच्यासह गावातील प्रतिष्ठीतांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे....