किनवट प्रतिनिधी नव्याने निर्माण झालेल्या मोहपूर जिल्हा परिषद गटात राजकीय हालचालींना वेग आला असून गतवेळी शिवसेनेकडून मांडवी गणातून निर्णायक मतदान घेणारे अंबाडी येथील तरुण युवा कार्यकर्ते विशाल हलवले
यांनी आता जिल्हा परिषदेसाठी दंड थोपटले असून मोहपूर गटाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकआग्रहास्तव मी ही निवडणूक मोठ्या ताकतीने लढणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले
नांदेड जिल्हा परिषदेची गट व गणनिहाय प्रभाग रचना नुकतीच प्रसिद्ध झाली असून किनवट तालुक्यात मोहपूर या नवीन गटाची निर्मिती करण्यात आली आहे
या गटात अंबाडी गावाचा समावेश करण्यात आल्यामुळे आतापासूनच राजकीय हालचाली वाढल्या असून प्रमुख पक्षांसह जुने व नवीन चेहरे निवडणुकीचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत
यात प्रामुख्याने गतवेळी शिवसेनेकडूनकडून मांडवी गणातून निवडणूक लढवलेले तरुण युवा कार्यकर्ते विशाल हलवले यांच्या नावाची आता जिल्हा परिषदेसाठी चर्चा सुरू झाली असून त्यांच्यासाठी आंबाडी व परिसरातील असंख्य कार्यकर्ते
आतापासूनच गावभेटी घेऊन वातावरण निर्मिती करण्यावर भर देत आहेत गेल्यावेळी हलवले यांनी अठराशे च्या आसपास मतदान घेऊन मांडवी गटात खळबळ उडवून दिली होती
या भागातील आदिवासी, बंजारा, दलित व मुस्लिम समाजात त्यांचा दांडगा संपर्क असून गोरगरीब, शेतकरी शेतमजुरांच्या प्रश्नासाठी ते रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे एक निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात युवा नेते विशाल हलवले
यांनी आता नव्याने अस्तित्वात आलेल्या मोहपूर गटासाठी निवडणूक लढवावी यासाठी त्यांचे समर्थक आग्रही असून त्यांच्या उमेदवारीला जनतेचा मोठा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे
नव्या गटातील एक निष्पक्ष निष्कलंक नवाचेहरा म्हणून विशाल हलवले यांच्याकडे पाहिले जात आहे
त्यांच्या पाठीमागे असलेली युवा कार्यकर्त्यांची फळी व या भागातील मतदारांचा पाठिंबा लक्षात घेता हलवले यांची उमेदवारी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे
दरम्यान या संदर्भात त्यांनी पत्रकारांशी बातचीत करताना सांगितले की मी गेल्या दहा वर्षांपासून एक कार्यकर्ता म्हणून सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी काम करत आलो
मोहपूर भागाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकाग्रहास्तव मी निवडणूक लढण्यास इच्छुक आहे सध्या मी कोणत्याही पक्षात नसलो तरी लोकांसाठी काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून
या भागातील मतदारांचा मला मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे ही निवडणूक एखादया पक्षाकडून लढवायची की अपक्ष लढवायची याचा निर्णय आरक्षण जाहीर झाल्यानंतर
कार्यकर्ते व मतदारांना विचारपूस करून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले
निवडणुकीला अजून बराच अवधी शिल्लक आहे