Ticker

6/recent/ticker-posts

शिवरायांच्या मावळ्यात प्रमाणे काम करू, अब्दुल वसीम यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश किनवट


शिवरायांच्या मावळ्यात प्रमाणे काम करू, अब्दुल वसीम यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश किनवट 

दिनांक03/06/22 प्रतिनिधी शिवसेना नेते माननीय लक्ष्मणराव वडले, संपर्कप्रमुख आनंदराव जाधव साहेब ,

जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, खासदार हेमंत भाऊ पाटील तथा तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अब्दुल वसीम

 यांचा नुकताच शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला असून शिवसेनेसाठी शिवरायांचा मावळया प्रमाणे काम करू 
असे प्रतिपादन अब्दुल वसीम यांनी केले आहे. 

शिवसेना पक्ष हा कोण्या एका जाती धर्माचा नसून शिवरायांच्या अठरापगड जातीचे मावळे स्वराज्यासाठी लढले त्याच प्रमाणे शिवसेनेत

 सर्व जाती-धर्माचे लोक पक्षात काम करतात आणि आम्ही पक्षाचे मावळे प्राणपणाने पक्षहितासाठी समाज हितासाठी पक्षाचे आमदार नामदार अब्दुल सत्तार 

यांच्या प्रेरणेने व तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे पाटील यांच्या सहकार्याने काम करू व पक्ष बळकटीसाठी संबंध मतदारसंघ शिवसेना मय करू असे प्रतिपादन अब्दुल वसीम

 यांनी पत्रकारांशी बोलताना केले तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे पाटील यांनी मोठ्या प्रमाणात शिवसेनेसाठी व  सामाजिक कार्यासाठी वाहून घेतले आहे

 त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पक्ष हीताच्या कार्यासाठी आपण कटिबद्ध आहोत आणि जास्तीत जास्त उमेदवारांना निवडून आणण्या करिता व शिवसेना पक्ष कसा

 सर्व सामान्याचा आहे हे लोकांना पटवून  देण्याचे कार्य आपल्या हातून घडणार आहे

 याची ग्वाही आपण याची देही याची डोळा देणार अहो व असा संकल्प अब्दुल वसीम यांनी व्यक्त केला आहे.