Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्याच्या व्हॉलीबॉल संघात किनवट च्या राजू राठोड ची निवड,सहा. जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार व तहसीलदार जाधव यांचेकडून अभिनंदन


महाराष्ट्र राज्याच्या व्हॉलीबॉल संघात किनवट च्या राजू राठोड ची निवड,सहा. जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार
 व तहसीलदार जाधव यांचेकडून अभिनंदन.
किनवट,,दिलिप  

केंद्र शासनाच्या व दिल्ली सरकारच्या वतीने दिनांक 24 जून ते 28 जून 2022 दरम्यान होणाऱ्या

 अखिल भारतीय नागरी सेवा व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात मांडवी तालुका किनवटचे महसूल कर्मचारी राजू जयसिंग राठोड यांची नियुक्ती झाली आहे.


राठोड यांची राष्ट्रीय पातळीवरील  ही निवड आठव्यांदा करण्यात आली आहे. मागील महिन्यात गुरुगोविंद सिंग जी स्टेडियम नांदेड 

येथे पार पडलेल्या महसूल कर्मचारी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात 

यांच्या बरोबरीने क्रीडा ज्योत घेण्याचा मान त्यांना मिळाल्याने नांदेड महसूल कर्मचारी वर्गात कमालीचा आनंद निर्माण झाला होता. 

आणि आता राज्य व्हॉलिबॉल संघात निवड झाल्याने जिल्हाधिकारी, साह.जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार सर 

किनवट च्या तहसीलदार मृणालीजाधव, सह सर्व महसूल कर्मचारी, त्यांचे मित्र परिवार, 

मानवी परिसरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.