Ticker

6/recent/ticker-posts

किनवट (ता.प्र.)आदिलाबाद ते परळी पॅसेंजर रेल्वेतून दिनांक २७ जुलै रोजी सागवान तस्कर १० अवैद्य सागवान लाकडाचे कटसाइज रेल्वेतून तस्करी करत असल्याची माहीती किनवट येथील ASI / RPF सरवार खाँन


किनवट (ता.प्र.)आदिलाबाद ते परळी पॅसेंजर रेल्वेतून दिनांक २७ जुलै रोजी सागवान तस्कर १० अवैद्य सागवान लाकडाचे कटसाइज रेल्वेतून तस्करी करत असल्याची माहीती किनवट येथील ASI / RPF सरवार खाँन 

यांना मिळताच पोलिस निरीक्षक /RPF पासवान आदिलाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून

 त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेवून सागी कटसाईज पकडल्याने रेल्वेतून नेहमीच तस्करी करणाऱ्यांचे धाबे दनानले आहेत .

दिनांक २७ जुलै २०२२ रोजी पहाटे आदिलाबाद ते परळी ट्रेन क्रमांक ०७७७५ ने सागवान तस्कर

 १० अवैद्य सागवान लाकडाचे कटसाईजची तस्करी करत असल्याची गुप्त माहिती किनवट येथील AS I /RPF सरवार खान यांना मिळताच 

त्यांनी त्यांचे वरिष्ठ आदिलाबाद येथील पोलिस निरीक्षक पासवान यांच्या मार्गदर्शना खाली सापळा रचून 

त्यांचे कर्मचारी व फॉरेस्ट चे कर्मचारी यांना सोबत घेवून बाजारात ५५००० किमंत असलेली १० सागवान कटसाईज पकडले . 

तस्कर पळून जाण्यात यशस्वी झाला असलातरी कर्तेव्य दक्ष ASI / RPF सरवार खान  हे नव्याने किनवट येथे रुजू झाले 

असून ते प्रत्येक रेल्वेला आपल्या सहकाऱ्याना सोबत घेवून रेल्वे तपासत असल्याने रेल्वेतून नेहमीच सागी लाकडाची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दनानले आहेत .