Ticker

6/recent/ticker-posts

अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करा...आमदार भीमराव केराम यांची जिल्हा प्रशासनाला सूचना!


अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करा...

आमदार भीमराव केराम यांची जिल्हा प्रशासनाला सूचना!

किनवट :-दि.११ प्रतिनिधी
मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या संतधर पावसामुळे माहूर किनवट तालुक्यातील परिस्थिती परभणी झाली 

असून नागरी वस्तीमध्ये देखील सखल भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.

शेतकऱ्यांवर कोसळलेल्या नैसर्गिक संकटामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 

जास्त किनवट माहूर तहसीलदारांनी तात्काळ पंचनामे करून तातडीची आर्थिक मदत करण्याची सूचना आमदार भीमराव केराम यांनी दिनांक ११ जुलै रोजी पत्राद्वारे जिल्हाधिकारी नांदेड यांना केली आहे.

चालू वर्षात माहूर किनवट तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात अतिवृष्टीचा पाऊस सुरु असून या सततधार पाऊसामुळे असंख्य शेतकरी,नागरिकांचे नुकसान झाले 

असल्याचे बातम्या येत आहे.मान्सून चा पाऊस उशिराने आल्याने अधिकांश शेतकऱ्यांचे बियाणे निघालेच नाही.

तर काहीचे पेरण्या बाकी आहे,ज्यांनी पेरले त्यांचे पिक सततधार अतिवृष्टीमुळे भुईसपाट झाले असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला 

असून ग्रामीण भागातील अनेक खेडेगावात सांड पाण्याचा निचरा होत नसल्याने सखल भागात पुराचे पाणी शिरल्याने अनेकांच्या घराची पडझड व अन्न धान्याची नुकसान झाले संसार उपयोगी साहित्य वाहून गेले आहे. 

अजुनही पावसाचा जोर वाढत असल्याने पुढील खबरदारीचा उपाय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्क करून उपाय योजना आखावेत व सोबतच  तातडीने किनवट माहूर तालुक्यातील अतिवृष्टी भागाची पाहणी करून त्यांचे रितसर पंचनामे करून 

त्यांना अपातकालीन सर्वतोपरी मदत मिळण्याची तातडीने कार्यवाही करून सहकार्य करावे हि विनंती देखील आमदार भीमराव केरामयांनी पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांना केली आहे. 

शिवाय पावसाचा जोर ओसरल्यानंतर ते स्वतः पीक नुकसानीची पाहणी करणार असल्याची माहिती त्यांचे निकटवर्तीय सूत्रांनी दिली आहे.