Ticker

6/recent/ticker-posts

मुसळधार पावसामुळे बेघर झालेले कुटुंबीयांच्या मदतीसाठी धावली अमन रोटी,कपडा,अनाज बँक निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी केले होते मदतीसाठी आवाहन


मुसळधार पावसामुळे बेघर झालेले कुटुंबीयांच्या मदतीसाठी धावली अमन रोटी,कपडा,अनाज बँक 

निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी केले होते मदतीसाठी आवाहन

यवतमाळ (वासीक शेख) : यवतमाळ जिल्ह्यात मागील 24 तासापासून मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे काही कुटुंब बेघर होणे,त्यांचे घरांचे व मालमत्तेचे अंशतः किंवा पुर्णतः नुकसान होणे अश्या घटना समोर येत आहेत.

शासकीय मदत संबंधित कुटुंबांना देण्यात येत आहे परंतू काही गरजू व्यक्तींसाठी,बालकांसाठी स्वच्छ व वापरण्यायोग्य कपड्यांची आवश्यक आहेत.

आपली छोटीशी मदत गरजु व्यक्तींसाठी फार मोलाची ठरु शकते त्यामुळे आपण पुढे येऊन मदत करावी. स्वच्छ व वापरण्यायोग्य सर्व वयोगटातील कपडे

 (स्त्री, पुरुष दोन्हीसाठी) आपण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष ,जिल्हाधिकारी कार्यालय ,यवतमाळ येथे जमा करावेत असे आवाहन ललितकुमार वऱ्हाडे निवासी उपजिल्हाधिकारी, यवतमाळ यांनी केले होते. 

या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत आपली सामाजिक बांधिलकी जोपत यवतमाळ

 येथील ज़म ज़म ले-आउट  पांढरकवड स्थित अमन रोटी,कपडा,अनाज बँक यांच्या वतीने एक पूर्ण टाटा एस भरून घालणे 
योग कापडे (महिला,पुरुष,लहान मुला-मुलींचे) 

१०० जोडी लहान मुलांचा नवीन चपले, ३० जोडी मोठ्या लोकांचे चपले यवतमाळ येथील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षात जमा करण्यात आले 

यावेळी अमन रोटी,कपडा,अनाज बँक तसेच सदा ए उर्दू बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष समी उल्लाह खान सर, संस्थेचे सचिव शरीक शेख सर उपस्थित होते 

तसेच यावेळी प्रा.घन: शाम दरणे समन्वयक,सेवाभावी संस्था आणि सुरेश भाऊ राठी,अध्यक्ष,राठी ट्रस्ट हे सुद्धा उपस्थित होते. 

अमन रोटी,कपडा,अनाज बँक च्या या कौतुकस्पद कामाची सर्वत्र प्रशंसा केली जात आहे.