Ticker

6/recent/ticker-posts

किनवट पालिकेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्या - माजी नगराध्यक्ष इसा खान यांची मागणी


किनवट पालिकेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्या - माजी नगराध्यक्ष इसा खान यांची मागणी                                      
    किनवट - येथील नगर पालिकेस कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने गेल्या जवळपास दीड वर्षापासून प्रभारी राज सुरू आहे.शहरात सुरु असलेली विकासकामे दर्जेदार होण्यासोबतच प्रशासकीय कामात सुधारणा होण्यासाठी येथे कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त करा,

अशी मागणी माजी नगराध्यक्ष इसा खान सरदार खान यांनी केली आहे.     येथील पालिकेचे मुख्याधिकारी नीलेश सुंकेवार यांची दि. ४ मे २०२१ रोजी येथून बदली झाली.

तेव्हापासून मुख्याधिकारी पद रिक्तच असून,तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांच्याकडे प्रभारी मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार आहे.

कायमस्वरुपी मुख्याधिकारी नसताना शहरात कोट्यवधींची विकासकामे सुरू आहेत.होणाऱ्या कामांवर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने कामे दर्जेदार होत नसल्याचा आरोप इसा खान 

यांनी केला आहे.वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी शहरातील सर्वच रस्ते खोदले आहेत.

योजनेचे काम गेल्या ८ महिन्यांपासून सुरूच आहे.खोदलेल्या रस्त्यामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट आहे.
अतिक्रमणे,अनधिकृत बांधकामे वेगाने सुरूच आहेत. तसेच  शहरातील नगर परिषदेच्या मालकीच्या मोकळ्या भूखंडावरील अतिक्रमणे कारून अनधिकृत बांधकाम  सुरू आहेत. 

 नळांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे.कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने प्रशासनातही सुसूत्रता नाही.

पेसातंर्गत असलेल्या पालिकेत दीड वर्षापासून मुख्याधिकारी पद रिक्त असणे चुकीचे आहे.कायमस्वरुपी मुख्याधिकारी नियुक्त करावा,

यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार असल्याचे इसा खान यांनी सांगितले.दरम्यान, पालिकेस कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त करण्याच्या मागणीसाठी सत्ताधारी भाजपच्याच नगरसेविकेने दि.२६ जानेवारी २०२२ रोजी 

आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालयाच्या मुंबईस्थित कार्यालयापुढे आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.

त्यानंतर दि.१८ जानेवारी २०२२ रोजी प्रभारी सहआयुक्त,नगर परिषद प्रशासन संचालक,मुंबई 

यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना किनवट नगर पालिकेत रिक्त असलेल्या मुख्याधिकारी पदावर स्वतंत्र पदभाराची नियुक्ती करण्याचे आदेश काढले होते.आदेशाच्या सहा महिन्यांनंतरही पालिकेत प्रभारी राजच सुरू आहे.